मुले कधी मोठी होतात काही कळतच नाही. आता जन्नत जुबैर रहमानीलाच घ्याना. ओळखलंत? नाही? तीच जन्नत जी २०११ मध्ये कलर्स टीव्हीवरील फुलवा सिरीयलमध्ये दिसली होती. त्या क्युट, निरागस, आणि हिम्मतवाली फुलवाला कोण विसरू शकतो. तथापि आता हि लहानगी फुलवा मोठी झाली आहे. पूर्ण १८ वर्षांची आहे. वयाच्या या काळामध्ये फुलवा उर्फ जन्नत खूपच सुंदर झाली आहे.जन्नत जेव्हा ९ वर्षाची होती तेव्हा पासून एक बालकलाकार म्हणून काम करू लागली होती. ती मट्टी की बन्नो मध्ये देखील अवंतीच्या लहानपणाची भूमिका साकारताना पाहायला मिळाली होती. पण तिला फुलवामधून खूप लोकप्रियता मिळाली. नंतर ती भारत का वीर पुत्र महाराणा प्रतापमध्ये फुल राठोडच्या लहानपणाची भूमिका साकारताना पाहायला मिळाली होती. तिने तू आशिक़ी, इश्क में मरजवां, कर्मफल दाता शनि आणि सावधान इंडिया सहित अनेक सिरियल्समध्ये काम केले आहे. टीव्हीसोबतच तिने हिचकी, एक थी डायन आणि लव का द एंड सारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. जन्नत सोशल मिडियावर देखील खूपच अॅक्टिव असते. इंस्टाग्रामवर तिचे १ करोड ८० लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.जन्नत स्वभावाने खूपच चंचल आहे आणि मस्तीखोर आहे. तिचा हा स्वभाव तिच्याद्वारे बनवलेल्या मजेदार व्हिडिओंमधून देखील पाहायला मिळतो.जन्नतला एक भाऊ देखील आहे. आयन जुबैर. आपल्या बहिणीप्रमाणेच तो देखील टीव्हीवर एक बालकलाकार म्हणून काम करतो. जन्नत आपल्या छोट्या भावासोबत देखील अनेक मजेदार व्हिडिओ बनवून शेयर करत असते.जन्नत टिकटॉकवर देखील खूपच लोकप्रिय आहे. टिकटॉकवर तिचे २ करोड ८० लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तथापि सध्या टिकटॉकवरील बंदीमुळे तिला तेथे व्हिडिओ बनवता येत नाहीत. याशिवाय तिने इश्क़ फर्जी, तेरे बिना, ये मन सारख्या अनेक म्युझिक अल्बममध्ये देखील काम केले आहे. तसे तुम्हाला फुलवा उर्फ जन्नतचे हे फोटो आणि व्हिडिओ कसे वाटले? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.