एके काळची बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री राहिलेली आणि अमिताभ बच्चन यांची पत्नी जया बच्चन आज आपला ७२ वा वाढदिवस साजरा करत आहे. जया बच्चनचा जन्म ९ एप्रिल १९४८ रोजी झाला होता. जया बच्चन भले हि चित्रपटांपासून दूर आहे पण एक काळ असा होता कि ती बॉलीवूडची टॉपची अभिनेत्री होती. जया आणि अमिताभचे लग्न १९७३ मध्ये झाले होते तथापि काही काळानंतर अमिताभ आणि रेखाच्या अफेयरच्या बातम्या समोर येऊ लागल्या होत्या.

एके दिवशी जया बच्चनला देखील याबद्दलची सर्व हकीकत समजली. यानंतर जया बच्चनने रेखाला डिनरवर बोलावून घेतले ज्यानंतर सर्वकाही बदलून गेले. अमिताभ बच्चन त्यादिवशी एका चित्रपटाच्या शुटींगसाठी मुंबईच्या बाहेर गेले होते. जयाने हि संधी साधून रेखाला घरी बोलावून घेतले. यानंतर जे झाले त्यामुळे रेखा खूपच हैराण झाली.रेखा जेव्हा जया आणि अमिताभ यांच्या घरी पोहोचली तेव्हा जयाने तिचे स्वागत केले. तिच्यासोबत डिनर देखील केले. दोघींच्यामध्ये बरीच बातचीत झाली. पण विशेष म्हणजे अमिताभ बच्चनचा यादरम्यान जरासुद्धा उल्लेख झाला नाही. जेव्हा रेखा परत जाण्यासाठी निघाली तेव्हा जया दरवाजात रेखा म्हणाली कि काहीही झाले तरी मी अमिताभ यांना सोडून जाणार नाही.जयाची हि गोष्ट ऐकून रेखा जागच्या जागी स्तब्ध झाली. यादरम्यान रेखा जयाला काहीच बोलली नाही. अमिताभ बच्चनला जेव्हा याबद्दल समजले तेव्हा ते रेखापासून दूर राहणेच पसंत करू लागले. रेखा आणि अमिताभ बच्चन यांनी सिलसिला या चित्रपटामध्ये शेवटचे एकत्र काम केले होते. हा चित्रपट १९८१ मध्ये प्रदर्शित झाला होता. यानंतर हे दोघे कधीही एकत्र चित्रपटामध्ये काम करताना पाहायला मिळाले नाहीत आणि अमिताभ आणि रेखा यांची लव्ह स्टोरी संपुष्टात आली.