झी मराठीवरील ‘लागिर झालं जी’ ही मालिका लोकप्रिय होत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राशी आता प्रेक्षक रिलेट करू लागले आहेत. मालिकेतील प्रत्येक व्यक्तीने आपलं काम अगदी चोख केलं आहे. या कलाकारांबद्दल जाणून घेण्याची प्रत्येकाची उत्सुकता असते. महाराष्ट्र ही शूरांची, वीरांची भूमी.. देशासाठी प्राणपणाने लढणारे वीर या महाराष्ट्रात जन्मतात. शिवाजी जन्मावा पण शेजारच्या घरात असं न म्हणता माझ्या घरात निदान एक तरी शिवाजी जन्मावा असं मानणारी एक पिढी नाही तर पिढ्यानपिढ्या.. आणि एक घर नाही तर संपूर्ण गावच्या गाव अस तं ते महाराष्ट्रातच!

महाराष्ट्राच्या शूरवीरांना मानवंदना देणारी, त्या वीरांचा गौरव करणारी ‘लागिरं झालं जी’ ही एक आगळीवेगळी मालिका झी मराठीवर सोमवार ते शनिवार सायंकाळी सात वाजता अवतरत होती. वेगळे विषय आणि नाविन्यपूर्ण कथा याबरोबरच जिवंत सादरीकरण या नेहमीच झी मराठीच्या जमेच्या बाजू राहिल्या आहेत. याच परंपरेत आता एक नवा अध्याय लिहिला जात आहे तो “लागिरं झालं जी” या मालिकेचा!झी मराठीवरील प्रत्येक मालिका ही प्रेक्षकांच्या पसंतीला पडत असते. पण त्यातील काही पात्र अशी असतात जी मनाला भावतात. कधी त्यांच्या अभिनयाने तर कधी त्यांच्या मालिकेतीर रूपखेषेने. अशीच एक मालिका सध्या गाजत आहे आणि ती म्हणजे ‘लागिरं झालं जी’. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घरं केलंय. त्याला कारणंही तशीच आहेत अनेक नवोदित कलाकार या मालिकेत आहेत. त्यांनी मालिकेला मस्त उंचावर नेलयं. या नवोदित कलाकारांबरोबर एका अशा कलाकार आहेत ज्यांनी सर्वांचच मन जिंकल आहे. आणि त्या म्हणजे ‘जीजी’ अज्याची आजी. नातवाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी ही जीजी प्रत्येकालाच जवळची वाटते.मालिकेमध्ये नऊवारी आणि अस्सल गावाकडची भाषा बोलणारी ही ‘जीजी’ खऱ्या आयुष्यात मात्र बरीच उत्साही असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांच्या काही फोटोंचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरही बराच चर्चेत आहे. मुख्य म्हणजे या फोटोंमध्ये असणाऱ्या ‘जीजी’ ही भूमिका साकारणाऱ्या कमल ठोके यांना पहिल्याच वेळेस ओळखताही येत नाहीये. पण, त्यांचा हा अंदाज मात्र अनेकांचीच दाद मिळवत आहे. कलाकार त्यांची भूमिका साकारण्यासाठी स्वत:मध्ये किती बदल करतात आणि त्या भूमिकांना कशा प्रकारे दाद देतात हेसुद्धा जीजींचे फोटो पाहता लक्षात येत. या जीजीचे सोशल मीडियावरील फोटो हेच सांगतात की हा कलाकार किती मनमौजी आहे. वयाच्या 70 व्या वर्षी देखील यांचा फिटनेस आणि आनंद लुटण्याचा प्रकार खूप सुंदर आहे. जगाचा भरभरून आनंद लुटण्याचं काम या करत आहे. कमल ठोके असं या जीजींच खरं नाव.कमल ठोके यांनी वयाची ३३ वर्षे शिक्षिका म्हणून काम केले होते. शिक्षणाची आवड असल्याने त्यांनी १० वि नंतरचे शिक्षण रात्रीच्या शाळांमध्ये जाऊन पूर्ण केले होते. मग यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून एम ए चे शिक्षण पूर्ण केले. सोबतच अध्ययन क्षेत्रात शिक्षण पूर्ण करत त्या शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. त्यांचे पती गणपती ठोके हे देखील शिक्षक होते. २००५ साली मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त होत, आदर्श शिक्षिका देखील ठरल्या त्यांच्या कार्याबद्दल सातारा जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार डॉ. श्रीराम लागू यांच्या हस्ते मिळाला होता. इतकेच नव्हे तर लहानपणापासून अभिनयाची आवड जोपासत अनेक दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी मराठी चित्रपटात काम देखील केले आहे. परंतु लागिर झालं जी मधील जिजी या भूमिकेने त्यांना खरी ओळख मिळाली होती.
जीजी म्हणजे कमल ठोके यांनी या अगोदर अनेक मराठी सिनेमांत काम केलंय. माहेरची साडी या सिनेमातील अलका कुबलसोबतचा फोटो देखील आहे. त्याचप्रमाणे अविनाश नारकर आणि इतरांसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
७० पार झालेल्या या जिजीच खरं नाव कमल गणपती ठोके. शनिवारी आपल्या लाडक्या याच जिजींच कर्करोगाच्या आजाराने निधन झालं आहे. त्यांच्यावर बंगळुरू येथील रुगालयात उपचार सुरू होते. काल १४ नोव्हेंबरला सायंकाळी त्यांचे आजाराने निधन झाले. सर्वांवर माया, प्रेम करणाऱ्या या जिजी काळाच्या पडद्याआड झाल्या. मिक्समराठी टीम कडून लाडक्या कमल ताई म्हणजेच जिजी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.