बॉलीवूडचे जितके स्टार्स फेमस आहेत त्याहीपेक्षा जास्त छोट्या पडद्यावरील अनेक कलाकर दर्शकांद्वारे पसंत केले जातात. ते आपल्या उत्कृष्ठ अभिनयाने लोकांच्या मनामध्ये एक वेगळे स्थान निर्माण करतात आणि नेहमीच आठवणीत राहतात. टीव्हीवर अशा अनेक सिरीयल आहेत ज्याची स्टोरी लोकांना आजसुद्धा चांगली वाटते. काही वर्षांपूर्वी टीव्हीवर भारतीय इतिहासावरील एक सिरीयल प्रसारित केली जात होती ज्याची स्टोरी हिंदू राजपूत राजकुमारी जोधा आणि मुघल शासक अकबरवर आधारित होती.बॉलीवूड चित्रपट जोधा-अकबरदेखील खूपच सुपरहिट चित्रपट ठरला होता. जर टीव्हीवरील जोधा अकबर बद्दल बोलायचे झाले तर हि हिंदू राजकुमारी आणि मुघल शासकची प्रेमकहाणी आहे. ज्यामध्ये एक राजुकुमारी आपला धर्म, समाज, जीवनशैली सर्वकाही सोडून दुसरा धर्म स्वीकारते. हि प्रसिद्ध टीव्ही सिरीयल २०१३ मध्ये प्रसारित केली जात होती.तेव्हापासून आतापर्यंत या सिरीयलमधील अभिनेता आणि अभिनेत्रीचा लुक खूपच बदलला आहे. या सिरीयलमध्ये जोधाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नाव परिधी शर्मा होते आणि या सिरीयलमध्ये तिला अशाप्रकारे दाखवण्यात आले कि ती खरोखरच ती खरी जोधा वाटत होती. २०१३ मध्ये टीव्हीवर प्रसारित होणारी हि सिरीयल खूपच लोकप्रिय झाली होती.जोधाची भूमिका परिधीने खूपच चांगल्या प्रकारे साकारली होती ज्यामुळे ती दर्शकांची मने जिंकण्यात यशस्वी झाली होती तर अकबरची भूमिका राज टोकसने साकारली होती. या दोघांनी जोडी दर्शकांना खूपच पसंत आली होती आणि हि सिरीयल पहिल्यानंतर असे वाट होते कि खरोखरच जोधा आणि अकबर पुन्हा अवतरीत झाले आहेत. या लोकप्रिय सिरीयलमुळे हे दोन्ही कलाकार रातोरात स्टार झाले होते.पण काळानुसार आता खूप काही बदलले आहे. जोधाची भूमिका साकारणारी परिधी शर्माच्या लुकमध्ये खूपच बदल झाला आहे आता ती पहिल्यासारखी मुळीच दिसत नाही. हि सिरीयल खूपच लोकप्रिय झाली होती आणि सिरीयल बंद झाल्यानंतर जोधाची भूमिका साकारणारी परिधी अचानक छोट्या पडद्यावरून गायब झाली. टीव्हीवरील हि जोधा सध्या पुन्हा एकदा चर्चेमध्ये आली आहे.यावेळी ती टीव्ही सिरीयल मुळे नाही तर आपल्या लुकमुळे चर्चेमध्ये आली आहे. जवळ जवळ दोन वर्षांपूर्वी तिने एका मुलाला जन्म दिला होता पण तिने हि बातमी मिडियासोबत शेयर केली नाही. नुकतेच तिचे काही फोटो समोर आले आहेत ज्यामध्ये ती आपल्या मुलासोबत पाहायला मिळत आहे.