दूरदर्शनवर रामायण आणि महाभारत पुन्हा टेलीकास्ट केले जात आहे. लोकांना पुन्हा एकदा ८० च्या दशकातील काळ अनुभवण्यास मिळत आहे. दर्शक देखील रामायण आणि महाभारत या सिरियल्सला खूप पसंती देत आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का कि दूरदर्शनवरील महाभारत या सिरीयल साठी त्याकाळी गोविंदा आणि जुही चावला सारख्या दिग्गज कलाकारांचे नाव फाईनल करण्यात आले होते. परंतु काही कारणामुळे स्टारकास्ट बदलावी लागली.

जुही चावला आणि गोविंदाने त्यावेळी नुकतेच आपल्या फिल्मी करियरची सुरवात केली होती. तथापि दोघांचेहि चित्रपट सुपरहिट झाले होते ज्यामुळे दोघांनी बीआर चोपड़ा सोबत बातचीत करून या सिरीयल मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला कारण त्यांनी काही आगामी चित्रपट देखील साईन करून ठेवले होते. चला तर जाणून घेऊया काय होती महाभारत सिरीयल मधील खरी कास्ट.महाभारत सिरीयलमधील गजेंद्र चौहानने युधिष्ठिरची भूमिका साकारली होती. परंतु या भूमिकेसाठी सर्वात आधी दुसऱ्याच कोणाचीतरी निवड करण्यात आली होती. गजेंद्रने स्वतःच याबद्दल सांगितले आहे कि सर्वात पहिला माझी श्रीकृष्णच्या भुमिकेसाठी निवड करण्यात आली होती. जो कलाकार युधिष्ठिरची भूमिका साकारत होता, बीआर चोपड़ा त्याच्या कामावर खुश नव्हते. त्यामुळे मला ती भूमिका साकारण्यासाठी सांगण्यात आले.पहिल्यांदा मुकेश खन्ना हे गुरु द्रोणाचार्यची भूमिका साकारणार होते आणि पुनीत इस्सरला भीमची भूमिका मिळाली होती आणि जुही चावलाला द्रौपदीच्या भुमिकेसाठी कास्ट केले गेले होते. पण जुही चावलाचा कयामत से कयामत तक हा चित्रपट त्यावेळी बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. यानंतर जुही चावलाने हा शो सोडून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला.अभिमन्युच्या भूमिकेसाठी गोविंदाची निवड करण्यात आली होती. पण चित्रपट सुपरहिट झाल्यामुळे त्यांनी सुद्धा हा शो सोडण्याचा निर्णय घेतला. यानंतर चंकी पांडेला या भुमिकेसाठी ऑफर देण्यात आली. परंतु त्यानेही याला नकार दिला.