विक्रम लँडर चे लोकेशन सापडले इस्त्रोचे प्रमुख के. सिवान जाणून घ्या !

2 Min Read

विक्रम लँडर चे लोकेशन सापडले तमाम भारतीयांसाठी आनंदाची बातमी इस्त्रोचे प्रमुख के. सिवान यांनी ही आनंदवार्ता दिली आहे. १५ मिनिटांच्या शेवटच्या थरारक टप्प्यावर अचानक लँडरचा संपर्कतुटल्याने ही मोहीम अपयशी ठरली. चंद्राच्या पृष्ठभागापासून काही अंतरावर असतानाच चांद्रयान-२ मोहिमेतील विक्रम लँडरचा संपर्क तुटल्याने इस्त्रोच्या शास्त्रज्ञांसह सर्वांचे चेहरे उतरले होते. मात्र, काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर विक्रम लँडरचे ठिकाण शोधण्यात इस्त्रोला यश आले आहे. चंद्रावर विक्रम लँडरचे ठिकाण सापडले असून इस्त्रोचे प्रमुख के. सिवान यांनी ही आनंदवार्ता दिली आहे. “ऑर्बिटरने लँडरचे फोटो काढले असून संपर्क झालेला नाही. आम्ही संपर्क करण्याचे प्रयत्न करत आहोत”, अशी माहिती के. सिवान यांनी ‘एएनआय’ला दिली.

देशवासीयांसह जगाचे लक्ष लागलेल्या भारताच्या ‘चांद्रयान-२’ मोहिमेच्या अखेरच्या टप्प्यात अचानक ‘विक्रम लँडर’चा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला आणि उत्साहाने भरलेल्या ‘इस्रो’च्या मुख्यालयात निराशेचे मळभ पसरले होते. ७ सप्टेंबर रोजी एक वाजून ५५ मिनिटांनी या चांद्रमोहिमेतील शेवटच्या १५ मिनिटांचा थरार सुरू असतानाच ‘विक्रम लँडर’शी संपर्क तुटला होता. मात्र, “इस्रोच्या नियंत्रण कक्षाशी असलेला विक्रम लँडरचा संपर्क तुटला असला तरी पुढचे १४ दिवस विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जाईल”, असे इस्रोचे प्रमुख के.सिवन यांनी शनिवारी स्पष्ट केले होते.

विक्रम लँडरशी संपर्क तुटल्यानंतरही भारताच्या चांद्रयान-२ मोहिमेबद्दल जगभरातून इस्त्रोवर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच ही भारतीयांना सुखद धक्का देणारी घडामोड घडली आहे. “चंद्राच्या पृष्ठभागावरील विक्रम लँडरचे ठिकाण आम्हाला सापडले आहे. ऑर्बिटरने विक्रम लँडरचे थर्मल इमेज काढल्या आहेत. मात्र, लँडरशी संपर्क झालेला नाही. आम्ही विक्रम लँडरशी संपर्क करण्याचे प्रयत्न करत आहोत. लवकरच संपर्क होईल”, अशी माहिती के. सिवान यांनी दिली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *