बाईक चालवायला कोणाला नाही आवडत? आजकाल प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीकडे बाईक आहे. तुमच्या पैकी बऱ्याच जणांना वाटलं ही असेल बाईक मधे डिझेल टाकता आलं असतं तर किती बरं झालं असतं. पण मित्रांनो तुम्ही कधी हा विचार केलाय का, कि बाईक मध्ये डिझेल इंजिन का नाही वापरत? डिझेल हे स्वस्त, परवडणारे आणि जास्त ऊर्जेचे स्रोत मानले जाते. पण तरीही बाईक्स मध्ये आपण डिझेल इंजिन असलेले कधी पाहिलेले नाही.
मग का नाही वापरत बाईक मधे डिझेल इंजिन? आम्ही आज ह्या लेखात तुम्हाला ह्याच विषयी सांगणार आहोत. डिझेल इंजिन चा कंप्रेशन रेशिओ पेट्रोल इंजिन पेक्षा जास्त आहे. डोक्यावरून गेलं असेल तर सोप्प्या भाषेत सांगतो. इंधनाला लागणारी उष्णता वाढवण्यासाठी लागणारी ऊर्जा डिझेल इंजिन मध्ये पेट्रोल इंजिन पेक्षा जास्त असते. त्यामुळे ह्या उच्च दबावाला सांभाळण्यासाठी इंजिन मोठे आणि टणक धातूचे बनलेले असावे लागते. त्यामुळे डिझेल इंजिन हे पेट्रोल इंजिन पेक्षा मोठे असते आणि ते बाईक सारख्या छोट्या वाहनांवर बसवता येत नाही. उच्च कम्प्रेशन मुळे डिझेल इंजिन पेट्रोल इंजिन पेक्षा जास्त आवाज आणि वायब्रेशन निर्माण करते.

ह्या उच्च कंप्रेशन मुळेच हे इंजिन बनवण्यासाठी लागणारे धातू महाग मिळतात आणि त्यामुळे ह्याची किंमत सुद्धा वाढते. कमीतकमी ५०,००० चा फरक पडू शकतो. बाईक सारख्या छोट्या वाहनांची एवढी किंमत मोजणे परवडत नाही. मेन्टेनस आणि देखभालीचा खर्च येतो तो वेगळा. तसेच पेट्रोल इंजिनच्या तुलनेत डिझेल इंजिन मध्ये दर ५००० किलोमीटर वर तेल बदलावे लागते पेट्रोल इंजिनासाठी हेच १०,००० किलोमीटर आहे.
ह्या उच्च वायब्रेशन आणि आवाजाला सांभाळण्यासाठी छोट्या वाहनाला शक्य नसतं. त्यामुळे बाईक सारख्या छोट्या वाहनांमध्ये डिझेल इंजिन चा वापर केला जात नाही. तसेच डिझेल इंजिन पेट्रोल इंजिनाच्या तुलनेत १३% अधिक कार्बनडायऑक्साईड बाहेर फेकते. म्हणून हे इंजिन पेट्रोल इंजिनाच्या तुलनेत जास्त प्रदूषण करते जे पर्यावरणासाठी हानिकारक आहे. म्हणून ह्याचा उपयोग फक्त मोठ्या वाहनांमध्येच केला जातो. मोठी वाहने हि छोट्या वाहनांच्या तुलनेत कमी असतात त्यामुळे डिझेल मुळे होणारे प्रदूषण हे कमी होते.

डिझेल इंजिन ला हवा सिलेंडर मध्ये ढकलण्यासाठी टर्बोचार्जर किंवा सुपरचार्जर ची आवश्यकता असते ज्यामुळे त्याची साईज तर वाढतेच पण किंमत ही वाढते. तसेच डिझेल इंजिन ला सुरु करण्यासाठीच जास्त ऊर्जा लागते जी छोट्या वाहनांसाठी योग्य निवड नसते. रॉयल इन्फिल्ड ने सर्व चॅलेंजेस स्वीकारत तत्यांची पहिली डिझेल इंजिन बुलेट टॉरस लाँच केली, पण बुलेट ला आवाज जास्त होता आणि इंजिनामधे ही त्रुटी होत्या. तसेच जास्त वायब्रेशन मुळे आरोग्यविषयक समस्या येऊ लागल्या. त्यामुळे बाईक ला कार्बन उत्सर्जनाचे निकष भारतात पार करता आले नाहीत.
हीच कारणं आहेत बाईक मधे डिझेल इंजिन नसण्याची. आता आपल्या मागे सतत हे डिझेल इंजिन च रडगाणं म्हणणाऱ्या बाइकवाल्या मित्राला ही हा लेख वाचायला द्या आणि इतरांसोबत ही शेयर करा.