बॉलीवूडमध्ये नेहमी नेपोटिज्ममुळे आरोप प्रत्यारोप होत असतात. स्टार किड्सला अनेकवेळा त्यांच्या खराब कामगिरीमुळे ट्रोल केले जाते. जिथे बॉलीवूडमध्ये स्टार किड्सला लाँच करण्याची स्पर्धा नेहमी चालू असते तिथे दुसरीकडे कादर खानने आपल्या मुलांना बॉलीवूड मध्ये लाँच करण्यास नकार दिला होता. कादर खानचा मुलगा सरफराज खानचा जन्म २२ एप्रिल १९७६ रोजी झाला होता.

सरफराजला लहानपणापासूनच अभिनयामध्ये रुची होती आणि असणारच कारण त्याचे वडील कादर खान हे दिग्गज अभिनेता आहेत. परंतु कादर खान यांनी आपला मुलगा सरफराजला बॉलीवूड मध्ये लाँच करण्यास नकार दिला. कादर खान यांची जरासुद्धा इच्छा नव्हती कि त्यांच्या मुलाने बॉलीवूडमध्ये पदार्पण करून अभिनेता बनावे. कादर खान यांचे स्वप्न होते कि त्यांच्या मुलांनी सर्वप्रथम आपले शिक्षण पूर्ण करावे.शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जेव्हा सरफराजने कादर खान यांना आपल्या अभिनेता बनण्याच्या स्वप्नाबद्दल सांगितले तेव्हा कादर खान हे साफ नकार देत म्हणाले कि ते कोणी अमिताभ बच्चन नाही आहेत आणि त्याच्यावर पैसा लावण्यापूर्वी ते दोन वेळा विचार करतील. वडिलांची हि गोष्ट ऐकून सरफराज खूपच नाराज झाला. पण त्याने हिम्मत नाही हरली आणि त्याला चित्रपटामध्ये काम देखील मिळाले.परंतु सरफराज चित्रपटामध्ये काही खास कमाल दाखवू शकला नाही. बॉलीवूडमध्ये तो आपली खास ओळख बनवू शकला नाही. सरफराजने सलमान खानसोबत तेरे नाम चित्रपटामध्ये काम केले होते. या चित्रपटामध्ये त्याने सलमानच्या मित्राची भूमिका साकारली होती. चित्रपटांमध्ये सफलता न मिळाल्यामुळे सरफराज खूप निराश झाला. सध्या सरफराज आपली अॅरक्टिंग अकादमी चालवत आहे. ज्यामध्ये तो नवीन मुलामुलींना अभिनयाचे धडे देतो. त्याच्या बॅनरखाली अनेक प्ले यशस्वी झाले आहेत.