नुकतेच अभिनेत्री काजोल तिचा मुलगा युगसोबत मुंबईच्या एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये डिनर करण्यासाठी पोहोचली होती. या दरम्यान ती कॅमेऱ्यामध्ये स्पॉट झाली. काजोलने रात्रीच्या वेळी काळा गॉगल लावला होता. यादरम्यान ती बहुतेकवेळा मुलगा युगचा हात पकडलेली दिसली. असो अनेक सेलेब्रिटीज रात्रीच्या वेळी सनग्लासेज वापरतात आणि यासाठी ते नेहमी ट्रोल देखील होतात. अशामध्ये आता सोशल मिडियावर काजोलला देखील ट्रोल केले जात आहे.

सोशल मिडियावर काजोलचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. अनेक युजर अभिनेत्रीला रात्रीच्यावेळी काळा गॉगल घातल्यामुले ट्रोल करत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिले आहे, रात्रीच्या काळा चष्मा यामुळे घातला जातो ज्यामुळे पकडले जाऊ नये.

काजोल अशा कलाकारांपैकी एक आहे जे नेहमी कॅमेऱ्यापासून दूर राहणेच पसंद करतात. हेच कारण आहे कि ती जेव्हा देखील कुटुंबासोबत असते तेव्हा कॅमेऱ्यासमोर पोज देत नाही. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता कि काजोल तिच्या मुलाचा हात धरून चालत आहे आणि नंतर ती आपल्या गाडीमध्ये जाऊन बसते.

काजोल तिचा पती अजय देवगन आणि बॉलीवुड स्टार अजय देवगनसोबत तान्हाजी चित्रपटामध्ये शेवटची पाहायला मिळाली होती. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ गल्ला जमवला होता. या रियल लीफ कपलच्या केमिस्ट्रीला लोकांनी चित्रपटामध्ये खूप पसंद केले होते. काजोल ९० च्या दशकामधील टॉप अभिनेत्रींपैकी एक राहिली आहे. सुपरस्टार शाहरुख खानसोबत तिची जोडी आजदेखील चाहत्यांसाठी फेमस आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)