टीव्हीवरील प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा कधीच आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल उघडपणे बोलताना दिसत नाही. खासकरून तेव्हा जेव्हा गोष्ट त्याची पत्नी गिन्नी चतरथची असते. खरे म्हणजे तो आपली रोमँटिक लाईफ नेहमी वाचवून ठेवत असतो. अनेक लोकांना हे माहिती नाही कि गिन्नी आणि कपिल एकमेकांना गेल्या १५ वर्षांपासून ओळखतात. त्यांची पहिली भेट एका ऑडिशन दरम्यान झाली होती. परंतु १५ वर्षाचे नाते आणि आता लग्न, मुलगी हे सर्व झाल्यानतर जेव्हा यांच्या लव्ह अफेयर बद्दल बोलायचे झाले तर त्यांचे हे नाते एकदम नवीनच वाटते. एकदा कपिल शर्माने सांगितले होते कि तो २००५ मध्ये आईपीजे कॉलेज मध्ये स्टूडेंट्सचे ऑडिशन घेण्यासाठी गेला होता. तिचे गिन्नी ऑडिशन देण्यासाठी आली होती.याच कॉलेजमध्ये त्यांची पहिली भेट झाली होती. त्यावेळी कपिल पॉकेट मनीसाठी प्ले डायरेक्ट करायचा. तेव्हा गिन्नी १९ वर्षांची होती आणि कपिलचे वय २४ वर्षे होते. जेव्हा दोघांनी एकत्र काम करण्यास सुरवात केली तेव्हा दोघांची चांगली मैत्री झाली. गिन्नी आपला हा मित्र कपिलसाठी जेवण देखील करून आणत होती. तर एका मिडिया रिपोर्टरसोबत बातचीत दरम्यान कपिल म्हणाला होता कि एका मित्राने सांगितले कि गिन्नी तुला लाईक करते.
मला त्यावर विश्वास बसला नाही. याचबरोबर एक दिवस मी स्वतः गिन्नीला विचारले – तू मला लाईक करतेस का? आणि तिचे उत्तर होते होय. अशाप्रकारे सुरु झालेले हे मैत्रीचे नाते एका वेळी तुटण्यापर्यंत येऊन पोहोचले होते. तर कपिलने सांगितले कि जेव्हा तो करियरमध्ये पुढे जाण्यासाठी मुंबई आला आणि ऑडिशनमध्ये रिजेक्ट झाला तेव्हा त्याने गिन्नीला कॉल केला आणि म्हणाला कि तिने त्याला कधीच संपर्क साधु नये.
कपिल म्हणाला होता कि मी मैत्री तोडली आहे कारण या मैत्रीचे काहीच भविष्य नव्हते. तर आर्थिकदृष्ट्या ती माझ्यापेक्षा चांगल्या घरातून होती. परंतु दुसऱ्यांदा जेव्हा मी सिलेक्ट झालो तेव्हा गिन्नीने मला फोन करून शुभेच्छा दिल्या होत्या. कपिलने सांगितले कि, जेव्हा माझे काम सुरु झाले आणि मी कमाई करू लागलो तेव्हा माझी आई गिन्नीच्या घरी गेली आणि तिला लग्नाची मागणी घातली. परंतु गिन्नीचे वडिल शटअप म्हणाले. यानंतर मी माझ्या कामामध्ये खूप व्यस्त झालो. तर कपिल म्हणाला कि, इकडे मी कामात व्यस्त होतो आणि तिकडे गिन्नी लग्नाच्या दुसऱ्या प्रपोजल्सपासून दूर राहण्यासाठी अभ्यासामध्ये व्यस्त झाली.
मी मुंबईमध्ये सेटल झालो होतो. माझ्या आयुष्यामध्ये इतके काही सुरु होते. तेव्हा मला जाणीव झाली कि गिन्नीने मला कधीच डिस्टर्ब नाही केले. इतके धैर्य मी कधीच कोणामध्ये पाहिले नाही. त्यावेळी हीच वेळ होती जेव्हा मी निर्णय घेतला कि आता लग्न करण्याची वेळ आली आहे.