प्रसिद्ध विनोदी कलाकार कपिल शर्माची ओनस्क्रीन बायको सुमोना चक्रवर्ती सध्या खूपच चिंतेत दिसत आहे. तिचे असे म्हणणे आहे की तिला सध्या कोणी काम देत नाही. कुठेही काम मिळत नसल्यामुळे तिच्या वैयक्तिक आयुष्यात देखील खूप मोठा फरक पडला आहे. प्रसिद्ध विनोदी रियालिटी शो द कपिल शर्मा शो मध्ये सुमोना कपिल शर्मा च्या पत्नीचे भूमिका निभावते. तिच्या भूमिकेने प्रेक्षकांची मने आधीच जिंकून घेतली आहेत. परंतु सध्या तिला इतर कुठेही दुसरे काम मिळत नाही त्यामुळे ती मानसिकदृष्ट्या खचली आहे.

हल्लीच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान तिने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील काही गुपिते मीडिया समोर मांडली. सुमोना बोलली की ती सध्या जास्त कुठे सार्वजनिक ठिकाणी जास्त जात नाही, कोणत्याही पार्टीमध्ये जात नाही किंवा सोशल मीडियावर देखील जास्त ऍक्टिव्ह नसते. कार्यक्रमाचे शूटिंग संपल्यावर मी थेट घरी जाते किंवा माझ्या काही खास मित्रमैत्रिणींना भेटते.
त्यांच्यासोबत थोडावेळ घालवल्यावर मला थोडे बरे वाटते. लोक मला विसरत चालले आहेत ही गोष्ट मला हल्ली फार त्रास देत असते. त्याच बरोबर सुमोना असे देखील सांगितले की लोक तिला घमंडी समजतात. परंतु हे साफ चुकीचे आहे. मला कोणत्याच गोष्टीची कधीच घमंड नव्हती किंवा ती पुढे देखील नसणार आहे. ही गोष्ट पूर्णपणे खोटी आहे की, मी घमेंडी आहे. एक अभिनेत्री होण्याच्या नात्याने जे मी डिर्जव करते ते मी नक्कीच मागेन. ती म्हणाली की मला एखादे चांगले प्रकल्प किंवा काम मिळाले तर त्यासाठी वाटाघाटी करण्यासही मी तयार आहे.

सुमोना पुढे बोलली की मला सध्या कोणतेच काम मिळत नसल्यामुळे खूप काळजी वाटत आहे. मी लोकांशी समोरून बोलायला सुद्धा तयार असते. किंबहुना मी बोलते सुद्धा. सध्या मी लोकांसोबत कॉन्टॅक्टमध्ये असते. त्यांना फोन लावते. त्यांच्याशी मेसेज वर बोलते. देव जाणे याचा पुढे मला फायदा देखील होऊ शकतो. मी आता कोणतीही लाज न बाळगता स्वतःसाठी सगळ्यांकडे काम मागत असते. कपिल शर्मा शो च्या व्यतिरिक्त सुमोना मोठ्या पडद्यावर देखील दिसली होती. तिने सलमान खानच्या किक या चित्रपटात काम केले होते.सुमोना चक्रवर्ती तिच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तिने द कपिल शर्मा शो च्या व्यतिरिक्त बडे अच्छे लगते है मध्ये राम कपूर च्या बहिणीची भूमिका निभावली होती तसेच तिने खोटे सिक्के, निर भरे तेरे नैना देवी यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. सुमोना द कपिल शर्मा शो मधील खूप ऍक्टिव्ह मेंबर होती. त्या तिने कपिल च्या बायकोची भूमिका निभावली होती.

मागील काही दिवसांमध्ये सुमोनाचा सोशल मीडियावर एक फोटो खूप व्हायरल झाला होता ज्यात ती कपिल शर्मा शो मधील चंदू चहावाल्या सोबत लग्न करताना दिसत होती. त्यांच्या या फोटोला सोशल मीडियावर चाहत्यांनी खूप लाईक व शेअर देखील केले होते. परंतु खरेतर हा फोटो द कपिल शर्मा शो मधील कार्यक्रमाचा एक भाग होता.