करीना कपूर आणि करिश्मा कपूर दोघी सख्या बहिणी असूनदेखील क्वचितच एकत्र पाहायला मिळाल्या आहेत. दोघींनीहि बॉलीवूडमध्ये आपली एक खास ओळख निर्माण केली आहे. सध्या सोशल मिडियावर अनेक कलाकार अॅघक्टिव झालेले दिसत आहेत. काही कलाकार आपला वर्कआउट व्हिडिओ शेयर करत आहेत तर काही आपले जुने फोटो व्हिडिओ शेयर करत आहेत. करीना आणि करिश्मा दोघीसुद्धा सोशल मिडियावर खूपच अॅहक्टिव असतात. नुकतेच सोशल मिडियावर करीना कपूर आणि करिश्मा कपूरचा एक फोटो व्हायरल झाला आहे.

करीना आणि करिश्माचा हा फोटो करीनाच्या एका फॅन पेजवरून शेयर करण्यात आला आहे. अल्पावधीतच हा फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये करीना तिची मोठी बहिण आणि अभिनेत्री करिश्मा कपूरसोबत उभी असलेली पाहायला मिळत आहे. हा फोटो लोकांना खूपच पसंत येत आहे. दोघी बहिणी खऱ्या आयुष्यात एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी देखील आहेत. दोघींच्यामध्ये ६ वर्षे वयाचे अंतर आहे.करीना कपूरने नुकतेच आलीया भट्टबद्दल एक मोठा कुलासा केला होता. करीनाने आपल्या रेडियो शो दरम्यान म्हंटले होते कि बॉलीवूड अभिनेत्रींचे एकमेकींच्यासोबत स्पर्धा करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत आणि त्या आपल्या सोबत काम करणाऱ्या कलाकारांना प्रोत्साहित करणे सुद्धा नेहमी पसंत करतात.यादरम्यान करीनाने आलिया भट्टसोबत उडता पंजाब चित्रपटाच्या शुटींग दरम्यानचे आपले काही अनुभव शेयर करताना सांगितले होते कि, मला असे कधीच वाटले नव्हते कि उडता पंजाब चित्रपटामध्ये आलियाची भूमिका माझ्या भूमिकेपेक्षा वरचढ ठरेल, कारण तिची भूमिका त्या चित्रपटामध्ये खूपच दमदार होती.करीना आणि करिश्माबद्दल बोलायचे झाल्यास दोघीही अजूनपर्यंत एकाही चित्रपटामध्ये एकत्र काम करताना पाहायला मिळालेल्या नाहीत. याबद्दल करीनाला विचारले असतात ती म्हणाली कि, आम्ही दोघी एकत्र काम करायला खूपच उत्सुक आहोत पण अजूनपर्यंत आम्हाला तशी चांगली स्क्रिप्ट मिळालेली नाही. एखादी चांगली स्क्रिप्ट ऑफर झाली तर आम्ही दोघी नक्कीच एकत्र चित्रपटामध्ये काम करू.