करीना कपूर खानने आपल्या करियरमध्ये अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. करीनाने नुकतेच इंस्टाग्रामवर पदार्पण केले आहे. अवघ्या ३ दिवसांमध्ये तिच्या फॉलोअर्सची संख्या तब्बल १४ लाखाच्या वर गेली आहे. करीनाने या अकाउंटवर तैमुर, सैफ अली खान, आई बबिता कपूर आणि करिश्मा कपूरचे फोटो शेयर केले आहेत. तिने एक मॉडर्न, भोळी मुलगी पासून ते एका वेश्याची भूमिका देखील साकारली आहे. अलीकडेच तिने आपल्या टॉप भूमिकांबद्दल एक खुलासा केला आहे ज्यामध्ये तिच्या न्यूड सीन बद्दलहि तिने सांगितले आहे.

२०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या करीनाच्या हिरोईन या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवली नाही पण तरीही करीनाला या चित्रपटामध्ये साकारलेली भूमिका खूपच पसंत आहे. या चित्रपटामध्ये तिने न्यूड सीन सुद्धा दिला होता. अनुपमा चोप्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने आपल्या टॉप पाच भूमिकांबद्दल बातचीत केली. हिरोईन पासून करीनाला खूपच अपेक्षा होत्या पण चित्रपटामधील तिच्या भूमिकेबद्दल तिला खूपच टीकेचा सामना करावा लागला.या चित्रपटामध्ये दिलेल्या न्यूड सीनबद्दल करीना म्हणाली कि, या चित्रपटाबद्दल मला अभिमान वाटतो. मग याबद्दल कोणी काहीही म्हणो, करीनाने हा देखील खुलासा केला कि या चित्रपटाला दर्शकांनी नाकारले होते. ती म्हणाली, मला वाटते कि दर्शक मला याप्रकारच्या भूमिकेमध्ये पाहायला तयार नव्हते. मी या चित्रपटासाठी माझे हजार टक्के दिले आहे. मी यासाठी सर्वकाही केले आणि त्यात खोलवर गेले.करीना कपूर आणि इरफान खान अभिनित चित्रपट अंग्रेजी मीडियम १३ मार्चला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटामध्ये करीना आणि इरफान शिवाय राधिका मदानसुद्धा मुख्य भूमिकेमध्ये आहे. राधिका इरफानच्या मुलीची भूमिका साकारत आहे आणि करीना एका पोलीस ऑफिसरची भूमिका साकारत आहे. तर इरफान एक गरीब पिता बनला आहे ज्याला आपल्या मुलीला विदेशात शिकवायचे आहे. त्याचबरोबर करीना लाल सिंह चड्डा चित्रपटामध्ये आमिर खानसोबत दिसणार आहे.