प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खानचा मुलगा तैमुर अली खानची गणना बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय स्टार्सकिड्समध्ये केली जाते. तैमुरची लोकप्रियता इतकी आहे आहे कि त्याचे इतर स्टार किड्सच्या तुलनेत सर्वात जात फॉलोवर्स आहेत. तैमुरची एक झलक मिळवण्यासाठी फोटोग्राफर तासानतास वाट पाहत थांबलेले असतात. तैमुरचे फोटो सोशल मिडीयावर काही क्षणातच व्हायरल होतात.

नुकतेच करीना कपूरने दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान सांगितले आहे कि तिला आपला मुलगा तैमुरला एक खास गिफ्ट द्यायचे आहे जे पैशांनी विकत घेतले जाऊ शकत नाही. करीना कपूरने नुकतेच याबद्दल खुलासा केला आहे. जेव्हा करीनाला हा प्रश्न विचारण्यात आला कि तुला तुझ्या मुलाला कोणते गिफ्ट द्यायला आवडेल? यावर तिने आपल्या खास अंदाजामध्ये उत्तर देताना सांगितले कि मला माझ्या मुलाला त्याच्या स्वर्गीय आजोबांशी भेट घडवून द्यायची आहे.करीना पुढे म्हणाली कि जर कोणत्याही मार्गाने असे घडले असते तर माझ्या मुलाला स्वर्गीय मंसूर अली खान पटौदी आणि स्वर्गीय राज कपूर यांच्याशी भेट घडवून आणायची आहे. करीना आणि सैफचा एक फोटो गेल्या काही दिवसांपासून व्हायरल झाला आहे ज्यामध्ये तैमुर हेयर ड्रायर सोबत खेळताना पाहायला मिळत आहे.करीना आणि सैफ सध्या एकत्र आपल्या वेळ व्यतीत करत आहेत. काही दिवसांच्या पूर्वी तैमुरचा एक फोटो तुफान व्हायरल झाला होता ज्यामध्ये सैफ बाथरूमकडे जाताना दिसत आहे आणि तैमुर सुद्धा त्यांचा पाठलाग करताना पाहायला दिसत आहे. हा फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वेगाने व्हायरल झाला आणि लोकांना देखील हा फोटो तितकाच आवडला.
करीना कपूरच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाले तर नुकतीच ती अंग्रेजी मेडियम या चित्रपटामध्ये पाहायला मिळाली होती जो १३ मार्च २०२० रोजी प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट काही खास कमाल दाखवू शकला नाही परंतु करीनाने याआधी अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.