बॉलीवूड फिल्मी जगतामध्ये एकापेक्षा एक सुंदर अभिनेत्री आहेत ज्यांनी फिल्मी जगतामध्ये आपली एक विशेष जागा निर्माण केली आहे. अशा अभिनेत्रींनी आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक सुपरहिट चित्रपट बॉलीवूडला दिले आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिने बॉलीवूडमध्ये ज्यावेळी एंट्री केली होती त्यावेळी तिची खूपच खिल्ली उडवण्यात आली होती. पण पुढे जाऊन ती बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमधील टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक झाली.

आम्ही इथे ज्या अभिनेत्रीबद्दल तुम्हाला सांगत आहोत ती बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूर आहे. करिश्मा कपूरने बॉलीवूडमधील अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. राजा हिन्दुस्तानी चित्रपट जो १९९६ मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट करिश्मा कपूरच्या करियरमधील सर्वात मोठा हिट चित्रपट ठरला होता. सध्या ती फिल्म इंडस्ट्री पासून दूर आहे आणि आपल्या मुलांच्या संगोपानामध्ये व्यस्त आहे.करिश्मा कपूरने ज्यावेळी बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले होते त्यावेळी तिच्या लुकची अनेक वेळा खिल्ली उडवण्यात आली होती. काहींनीतर तिला लेडी रणधीर कपूर म्हंटले होते तर काहींनी ती एखाद्या मुलासारखी दिसते असे म्हंटले होते. परंतु इतके सर्व होऊन देखील करिश्मा कपूरने हार नाही मानली आणि जेव्हा तिचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला त्यावेळी ती संपूर्ण देशामध्ये पॉपुलर झाली आणि लोकांनी देखील तिच्या अभिनयाचे खूपच कौतुक केले.करिश्मा कपूरच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाले तर ती तिच्या काळातील एक प्रसिद्ध अभिनेत्री राहिली होती. तिने बॉलीवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. करिश्माने सलमान खान, आमिर खान, शाहरुख खान, सनी देओल, गोविंदा, अक्षय कुमार, अजय देवगन, जॅकी श्रॉफ अशा दिग्गज कलाकारांसोबत चित्रपटांमध्ये काम केले आहे. करिश्माने राजा बाबू, अंदाज, कुली नं १, जुड़वा, हीरो नं. १, बीवी नं १, हसीना मान जाएगी सारखे चित्रपट केले ज्यामधील बहुतांश चित्रपट सुपरहिट झाले.