बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये सध्या करिश्मा कपूर खूपच चर्चेमध्ये आहे. सध्या या चर्चेमध्ये तिची मुलगी समायराचा देखील समावेश झाला आहे. अशामध्ये बॉलीवूड इंडस्ट्रीमधील अनेक स्टार किड्स चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी पुढे येत आहेत. ९० च्या दशकामधील प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूरची मुलगी समायरा कपूर देखील आता मोठी झाली आहे. समायरा कपूर चित्रपटांमध्ये डेब्यू करणार का नाही असा प्रश्न जेव्हा करिश्मा कपूरला विचारला गेला तेव्हा ती खूपच भडकली आणि म्हणाली कि – हे तुम्हाला कोणी सांगितले? हे बिलकुल खोटे आहे.
यादरम्यान करिश्मा कपूर पुढे म्हणाली कि भलेहि माझ्या मुलीला चित्रपटांसंबंधित प्रत्येक गोष्ट आवडते पण सध्या तिला पडद्याच्या मागेच राहायला आवडते आणि तिचा ग्रुप एक एक्सपेरिमेंट करत आहे. तिचा हा ग्रुप सर्वकाही शिकत आहे. सध्या तिची अशी कोणतीही योजना नाही. समायरा अजून खूपच लहान आहे. ती सध्या शाळेत शिकत आहे.यादरम्यान करिश्माला हा देखील प्रश्न विचारला गेला कि समायराला तुझ्यासारखे एक प्रसिद्ध अभिनेत्री बनायचे आहे का? तेव्हा यावर करिश्मा म्हणाली कि हे सर्व तिच्यावर अवलंबून आहे. मी तिला कधीच फोर्स करणार नाही. तिला जे काही करायचे आहे त्यामध्ये मी नेहमी तिच्यासोबत आहे आणि तिची नेहमीच साथ देईन. मी तिच्या प्रत्येक निर्णयाचा आदर करीन.
करिश्मा कपूरची मुलगी समायरा कपूर सध्या फक्त १५ वर्षांची आहे. सध्या समायरा तिच्या आईसोबत राहते. करिश्मा कपूर आणि तिचा पती संजय कपूर यांचा काही वर्षांपूर्वी घटस्फोट झाला आहे. तरीही समायरा तिचे वडील संजय कपूरच्या खूपच जवळ आहे. ती आपल्या वडिलांना नेहमीच भेटायला जात असते.