९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूर आजसुद्धा तितकीच सुंदर दिसते. करिश्माचे चित्रपट दर्शकांना खूपच पसंत येतात. राजा हिंदुस्तानी चित्रपट तर सर्वांनाच माहिती असेल जो ब्लॉकबस्टर चित्रपट झाला होता. या चित्रपटाच्या २४ वर्षांनंतर करिश्माने एक मोठा खुलासा केला आहे.

करिश्मा कपूर सोबत या चित्रपटामध्ये आमिर खान मुख्य भूमिकेमध्ये होता. या चित्रपटामध्ये करिश्मा आणि आमिर खानने एक किसिंग सीन सुद्धा दिला होता, ज्याची खूपच चर्चा झाली होती. करिश्माने स्वतः सांगितले कि हा सीन शूट करताना ती खूप थरथर कापत होती.करिश्माने एका मुलाखतीमध्ये सांगितले कि राजा हिंदुस्तानी चित्रपटाबद्दल बऱ्याच आठवणी आहेत. पण जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला त्यावेळी लोकांनी किसिंग सीनचीच चर्चा जास्त केली. पण त्यांना माहित नव्हते कि हा सीन शूट करण्यासाठी आम्हाला ३ दिवस लागले होते. मी थरथर कापत होते आणि विचार करत होते कि हा सिंग केव्हा पूर्ण होते कारण फेब्रुवारी महिन्यामध्ये ऊटीमध्ये इतकी थंडी होती आणि हा सीन संध्याकाळी ६ वाजता चित्रित केला होता.सध्या करिश्मा भले चित्रपटांमध्ये कमी पाहायला मिळते पण अजूनही तिची लोकप्रियता काही कमी झाली नाही. करिश्मा लवकरच वेब सीरीज मेंटलहुडमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. करिश्मा कपूर आपल्या कामाशिवाय आपल्या मुलांच्या संगोपनाकडे देखील पूर्ण लक्ष देते. ती एक मल्टीटास्किंग वुमन आहे.

मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.