काही महिन्यापूर्वी बॉलीवूड अभिनेत्री कॅटरीना कैफने तिचा वाढदिवस साजरा केला होता. बर्थडे ट्रिपसाठी कॅटरीना, पती विक्की कौशल आणि मित्रांसोबत मालदीवला गेली होती. यादरम्यान तिच्यासोबत तिचा भाऊ सेबॅस्टियन लॉरेंट मिशेल आणि धाकटी बहीण इसाबेल कैफही होती. या ट्रिपमध्ये अभिनेत्री इलियाना डिक्रूझही दिसली होती. सेलिब्रेशनदरम्यान इलियानाला पाहून अनेक चाहते गोंधळामध्ये पडले होते.

तेव्हा बातमी अशी आली होती कि इलियाना आणि कॅटरीनाचा भाऊ सेबॅस्टियन रिलेशनशिपमध्ये आहेत. आता हि गोष्ट करण जौहरने कंफर्म केली आहे. कॉफी विथ करण ७ च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये करण जौहरने कॅटरीना कैफच्या कुटुंबासोबत इलियानाच्या नात्याबद्दल बातचीत केली. तिने म्हंटले कि आम्हाला कंफर्म करण्याची गरज नाही.

करण जौहरचे बोलणे ऐकल्यानंतर कॅटरीना कैफ हसू लागली. तिने मानले कि करणच्या नजरेतून काहीच चुकत नाही. इलियाना डिक्रूजने मालदीव ट्रिपचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते. मात्र तिने सेबॅस्टियनसोबतचा कोणताही फोटो शेअर केलेला नव्हता.

कॉफी विथ करण ७ मध्ये कॅटरीना कैफने भावा शिवाय आपल्या स्वतःच्या नात्याचा देखील खुलासा केला. कॅटरीनाचा पती विक्की कौशल सुरुवातीला तिच्या रडारमध्ये नव्हता. दिग्दर्शक जोया अख्तर पहिली व्यक्ती होती जिला तिने याबद्दल सांगिले होते. जोयाच्या पार्टीमध्ये कॅटरीनाला याची जाणीव झाली होती कि तिला विक्कीवर प्रेम झाले आहे.

कॅटरीना कैफ आणि विक्की कौशलने डिसेंबर २०२१ मध्ये राजस्थानच्या सवाई माधोपुरमध्ये लग्न केले होते. या लग्नामध्ये त्यंच्या कुटुंबियांशिवाय त्यांचे जवळ मित्र देखील सामील झाले होते. दोघांनी इंटीमेट सेरेमनीमध्ये लग्न केले होते. ज्याच्या चर्चा खूप झाल्या होत्या. प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर कॅटरीना लवकरच फोन भूत चित्रपटामध्ये दिसणार आहे. यामध्ये तिच्यासोबत ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी देखील मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ileana D’Cruz (@ileana_official)