प्रेमात अकंठ बुडालेले दिसले सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी, लग्नाचे फोटो आले समोर…

2 Min Read

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी विवाहबंधनात अडकले आहेत. दोघांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. फोटोमध्ये दोघे एकमेकांच्या प्रेमात अकंठ बुडालेले पाहायला मिळत आहेत. सिद्धार्थ आणि कियारा दोघांनी या खास प्रसंगी क्रीम आणि पिंक कलर निवडला.

सिद्धार्थ आणि कियारा दोघे या आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत आहेत. लग्नाचे फोटो सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केले आहेत. फोटो शेयर करताच चाहते त्यांच्या फोटोवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

लग्नाचे फोटो कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघे कपल सूर्यगड पॅलेसमध्ये लग्नानंतर जोडीने पोज देताना पाहायला मिळत आहेत. या नवविवाहित जोडप्याने त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर करताच चाहते आणि सेलिब्रिटींनी या जोडप्याच्या फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे.

माहितीनुसार दुपारी २ पासून ते ४ वाजेपर्यंत सिद्धार्थ आणि कियाराने सूर्यगढ पॅलेसमध्ये लग्न केले. चाहते दुपारपासून त्यांच्या लग्नाच्या फोटोंची आतुरतेने वाट पाहत होते. पण कलाकारांनी त्यांच्या लग्नाची झलक दाखवण्यासाठी चाहत्यांना बराच वेळ वाट पाहायला लावली आणि खूपच वेळाने फोटो शेयर केले.

लग्नाच्या अगोदर सोशल मिडियावर सूर्यगड पॅलेसमधील अनेक व्हिडिओ व्हायरल झाले. ज्यामध्ये राजवाडा फुलांनी सजवलेला पाहायला मिळाला. तर संगीत सेरेमनीमध्ये पिंक कलरच्या प्रकाशाने राजवाडा चमकताना दिसला. माहितीनुसार हे कलाकर लगेचच हनिमूनला रवाना होणा नाही, ज्याचे मुख्य कारण सिद्धार्थचे काही वर्क कमिटमेंट्स आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sidharth Malhotra (@sidmalhotra)

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *