चित्रपट निर्माता करण जौहरचा प्रसिद्ध चॅट शो ‘कॉफी विथ करण सीझन ७ मध्ये आतापर्यंत अनेक कलाकार हजेरी लावून गेले आहेत. यावेळी शोच्या ८ व्या एपिसोडमध्ये प्रीती आणि कबीर पुन्हा परत येणार आहेत. आम्ही बोलत आहोत कियारा अडवाणी आणि शाहिद कपूरबद्दल. दोघे शोदरम्यान खूपच मस्ती करताना पाहायला मिळाले. शोदरम्यान कियाराने आपले बेडरूमचे गुपित देखील उघड केले. शोच्या बिंगो सेगमेंटमध्ये करणने शाहिदला बेडवर कोणता रोल प्ले करतोस असा प्रश्न विचारला ?

यादरम्यान त्याने कियाराला देखील विचारले कि तू कधी असे काही केले नाहीस का ? ज्याचे उत्तर देताना अभिनेत्री पहिला लाजली आणि त्यानंतर ती म्हणाली कि माझी मम्मी हा शो पाहणार आहे. त्यानंतर करण, कियाराला विचारतो कि तुझ्या मम्मीला वाटते तू वर्जिन आहेस ?

करणच्या या प्रश्नांचे उत्तर देताना कियारा म्हणाली कि मला असे नक्कीच वाटते. यानंतर करण पुन्हा सिद्धार्थ मल्होत्रासोबतच्या रिलेशनशिपबद्दल तिला विचारतो कि, तुझे असे म्हणणे आहे का कि तू सिद्धार्थ मल्होत्रासोबत रिलेशनमध्ये नाहीस ?

यावर उत्तर देताना कियारा म्हणते कि मी नकार देत नाही आणि हो देखील म्हणणार नाही. यानंतर करण विचारतो कि तू आणि सिद्धार्थ मल्होत्रा खूप जवळचे मित्र आहात का ? ज्यानंतर कियारा म्हणते कि आम्ही क्लोज फ्रेंड आहोत.

कियाराच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अभिनेत्री सध्या तिच्या सत्यप्रेम की कथा या चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. चित्रपटामध्ये कार्तिक आर्यन तिच्यासोबत मुख्य भूमिकेमध्ये आहे. चित्रपट २९ जून २०२३ रोजी रिलीज होणार आहे. हि एक म्युझिकल लव्ह स्टोरी आहे.