सुशांत राजपूतच्या वडिलांनी पहिल्यांदाच अंकिता लोखंडे आणि मुलगा सुशांतच्या नात्यावर सोडले मौन !

2 Min Read

टीव्हीपासून बॉलीवूडपर्यंतचा प्रवास करणारा सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडेचे नाते का संपुष्टात आले. हा प्रश्न नेहमीच बनून राहिला आहे. आपल्या ब्रेकअपबद्दल कधी सुशांतने वक्तव्य तर ना अंकिताने केले नाही. सुशांतच्या मृत्युनंतर अंकिता दुखात आहे. अंकिता आणि आपला मुलगा सुशांतच्या नात्याबद्दल पहिल्यांदाच सुशांतचे वडील के के सिंह यांनी मौन सोडले आहे. मुलाच्या मृत्युनंतर त्यांनी दोघांच्या नात्याबद्दल बातचीत केली.सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युनंतर नुकतेच त्याच्या वडिलांनी एक मुलाखत दिली आहे. ज्यामध्ये त्यांनी आपला मुलगा आणि त्याची एकस गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेच्या नात्याबद्दल बातचीत केली. या बातचीतमध्ये के के सिंहने सांगितले कि अंकिता लोखंडे अशी एकमेव मुलगी आहे, जिच्याबद्दल त्यांना माहिती आहे. त्यांनी सांगितले कि सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे त्यांना भेटायला फक्त मुंबईलाच आली नव्हती तर ती पटनाला देखील त्यांना भेटायला आली होती.कृती सेननबद्दल त्यांनी सांगितले कि अंतिम संस्कारामध्ये खूप लोक आले होते कृती माझ्याजवळ आली होती. मी बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हतो, पण ती बोलत होती आणि आम्ही ऐकत होतो. कृती, सुशांतचे कौतुक करत होती आणि म्हणत होती प्रेमळ मुलगा होता. त्यांनी म्हंटले मास्कमुळे मला कोण ते ओळखू आले नाही, पण नंतर सांगितले कि ती कृती होती.सुशांत आणि अंकिताच्या ब्रेकअपवर देखील त्यांनी बातचीत केली. त्यांनी म्हंटले कि आता हा तर संयोग आहे, जे व्हायचे असते ते होतेच. सुशांतच्या लग्नाबद्दल त्यांनी म्हंटले कि नुकतेच मी सुशांतला म्हंटले होते कि लग्न कर. यावर सुशांतने उत्तर दिले होते कि सध्या कोरोना आहे आणि नंतर त्याचा एक चित्रपट देखील आहे जो पूर्ण करायचा आहे. यानंतर लग्नाचा विचार करणार आहे. हे विचारल्यानंतर कि सुशांत कोणासोबत लग्न करणार होता तेव्हा यावर त्यांनी सांगितले कि मी त्याला याबद्दल विचारले नव्हते. मी फक्त एवढेच सांगितले होते कि त्याला तुला ज्याच्यासोबत लग्न करायचे आहे तू करू शकतोस. माझी फक्त एवढीच इच्छा आहे कि तू सेटल व्हावेस.मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *