कोण डॉक्टर तर कोणी इंजिनियर, इतक्या शिकलेल्या आहेत ह्या क्रिकेटर्सच्या पत्नी !

4 Min Read

मित्रांनो तुम्ही क्रिकेटर्स ना नेहमीच फॉलो करत आला असाल. सचिन पासून ते विराट पर्यंत अनेक क्रिकेटर्स तुमचे फेव्हरेट असतील. त्यांच्या क्रिकेट च्या करियर पासून ते त्यांच्या आवडी निवडी पर्यंतच्या सर्वच गोष्टी तुम्हाला माहिती असतील. पण ह्या खेळाडूंच्या पत्नी किती शिकलेल्या आहेत आणि काय करतात हे माहिती आहे का? आज ह्या लेखामधून हीच माहिती तुम्हाला देणार आहोत.
१) अनुभूती चौहान – अनुभूती चौहान भारतीय क्रिकेटर पियुष चावला ची पत्नी आहे. पियुष चावला ने भारतीय टीम साठी गोलंदाज म्हणून आपली भूमिका निभावली असून तो लेग स्पिनर आहे. त्याची पत्नी अनुभूती चौहान फिलॉसॉफी मध्ये पी एच डी केली असून तीच्या कडे प्रोफेसर ची डिग्री आहे.
२) प्रियांका रैना – मित्रांनो प्रियांका रैना ही भारतीय टीम मध्ये गेल्या अनेक काळापासून आपली जागा पक्की करण्यात अपयशी ठरलेला ऑल राऊंडर क्रिकेटपटू सुरेश रैना ची पत्नी आहे. सुरेश रैना ची पत्नी सॉफ्टवेयर इंजिनियर असून तिने गाजियाबाद च्या कृष्ण इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीरिंग मधून बी टेक ची पदवी घेतलेली आहे.
३) अंजली तेंडुलकर – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ची पत्नी अंजली तेंडुलकर ला तुम्ही सर्वच ओळखत असाल. सचिन ची पत्नी भारतीय टीम ची तसेच मुंबई इंडियन्स ची मॅच बघण्यासाठी नेहमीच स्टेडियम मध्ये उपस्थित असते. सचिन उच्च शिक्षित नसला तरी त्याची पत्नी अंजली कडे मेडिकल ची डिग्री असून ती डॉक्टर आहे.
४) साक्षी सिंग धोनी – टीम इंडिया चा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्र सिंग धोनी ची पत्नी साक्षी सिंग धोनी लग्नाच्या अगोदर कोलकात्याला ताज बंगाल मध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून काम करायची. तिने हॉटेल मॅनेजमेंट चे शिक्षण घेतले असून दोघांची भेट त्याच हॉटेल मध्ये झाली होती असे म्हटले जाते.
५) विराट कोहली – टीम इंडिया चा कर्णधार विराट कोहली ची पत्नी अनुष्का शर्मा ला सर्वच ओळखतात. अनुष्का विराट च्या प्रत्येक मॅच ला हजर असते. ति आर्टस् मध्ये पदवीधर असून बॉलीवूड मध्ये सध्या आघाडीची अभिनेत्री म्हणून काम करते आहे.
६) विजेता पेंढारकर – तुम्हाला कित्तेक जणांना माहिती नसेल. टीम इंडिया ची भिंत म्हणून ओळखला जाणारा राहुल द्रविड स्वतः सुद्धा मराठी असून त्याची पत्नी ही मराठीच आहे. राहुल कर्नाटकात वाढला असला तरी तो उत्तम मराठी बोलतो. त्याची पत्नी विजेता पेंढारकर नागपूरची असून ती मेडिकल सर्जन आहे. राहुल च्या यशामागे तिचा खूप मोलाचा वाटा आहे.
७) आयेशा धवन – टीम इंडिया चा ओपनर फलंदाज शिखर धवन च्या प्रत्येक मॅच मध्ये दिसणारी आयेशा स्वतः एक खेळाडू आणि फिटनेस प्रेमी आहे. शिखर धवन ची पत्नी आयेशा ची इंस्टाग्राम वर खूप फॅन फोलोइंग असून ती प्रोफेशनल किकबॉक्सर आहे. आयेशा मूळची कोलकात्याची असून ऑस्ट्रेलियन नागरिक आहे.
८) डोना गांगुली – टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि सध्याचा बीसीसीआय प्रेसिडंट सौरव गांगुली म्हणजे दादाची दादागिरी आजही भारतीय क्रिकेट मध्ये पाहायला मिळते. गांगुली ची पत्नी बंगाली ओडिसी डान्सर असून तिची “दीक्षा मंजरी” नावाची स्वतःची नृत्यशाळा आहे ज्याची क्षमता २०० विद्यार्थी आहे. ह्या नृत्यशाळेचे उदघाटन गानकोकिळा लता मंगेशकर ह्यांनी केले होते.
९) रितिका सजदेह – हिटमॅन रोहित शर्मा ची पत्नी रितिका सुद्धा त्यांच्या प्रत्येक मॅच ला त्याच्या सोबत असते. ह्याचे कारण ही त्याच्या खेळाशी निगडित आहे. रितिका ने स्पोर्ट्स मॅनेजर म्हणून काम केले असून लग्न नंतर ती फक्त तिचा पती रोहितचेच स्पोर्ट्स टूर चे काम पाहते.
१०) सागरिका घाटगे – सागरिका घाटगे ही टीम इंडिया चा माजी जलदगती गोलंदाज झॅक म्हणजे झहीर खान ची पत्नी असून ती मूळची कोल्हापूरची आहे. जहीर स्वतः मराठी शाळेत शिकलेला असून तो महाराष्टीयन आहे. सागरिका मॉडेल आणि अभिनेत्री असून चक दे इंडिया मध्ये तिने केलेला प्रीती सबरवाल ची भूमिका सर्वांच्या चांगलीच लक्षात राहिली होती. तुम्हाला माहिती नसेल पण सागरिका कोल्हापूरच्या राजघराण्याची वंशज आहे.
भारतीय टीम मधल्या अनेक खेळाडूंची लग्न झाली नसली तरी त्यांचे अफेयर्सच्या चर्चा नेहमीच सुरु असतात. आम्ही तयार केलेली ही लिस्ट आवडली असेल तर नक्की लाईक करून शेयर करा आणि तुमची प्रतिक्रिया कमेंट करून कळवायला विसरू नका.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *