मोहब्बते चित्रपट २००० मध्ये प्रदर्शित झाला होता ज्यामध्ये अमिताभ बच्चन, शाहरुख खान, ऐश्वर्या राय सारख्या दिग्गज कलाकारांनी काम केले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ४२ करोडचा गल्ला जमवला होता. आज आम्ही तुम्हाला या चित्रपटाबद्दल काही खास गोष्टी सांगणार आहोत ज्या कदाचित तुम्हाला माहित नसतील.

या चित्रपटामध्ये ऐश्वर्याने मेघा नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये ऐश्वर्याचा चेहरा अजिबात दाखवण्यात आला नव्हता. त्यावेळी ऐश्वर्या फारशी लोकप्रिय नव्हती.

या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चनने गुरुकुलच्या प्रिंसिपलची भूमिका साकारली होती आणि अमिताभ बच्चनचे कपडे प्रसिद्ध डायरेक्टर करण जौहरने डिझाइन केले होते.चित्रपटामध्ये अमिताभ बच्चनच्या पत्नीची भूमिका साकारण्याची ऑफर श्रीदेवीला देण्यात आली होती परंतु काही कारणामुळे ती करू शकली नाही आणि हि भूमिका चित्रपटामधून काढून टाकण्यात आली.

या चित्रपटामधून उदय चोपड़ा, शमिता शेट्टी, जुगल हंसराज, किम शर्मा आणि प्रीति झंगियानी यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले आणि त्यांनी चित्रपटाच्या शुटींगसाठी ६ महिने अगोदरच रिहर्सल सुरु केली होती.चित्रपटामध्ये शाहरुख खानचे नाव आर्यन होते. हे नाव त्याच्या मुलाशी प्रेरित आहे. शाहरुख खानच्या मुलाचे नाव देखील आर्यन आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य चोप्रा आणि शाहरुख खान खूपच चांगले मित्र होते. यामुळे शाहरुखने चित्रपटाची स्क्रिप्ट न वाचता चित्रपट करण्यासाठी तयार झाला होता.