सिनेमा हा प्रत्येक भारतीयांच्या नसानसात भिनलेला आहे. मग तो सिनेमा असो, त्याची कथा असो, त्यातील गाणी असो किंवा कलाकारांचा अभिनय असो प्रत्येक सिनेरसिक त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो. त्यामध्ये तो स्वतःला कुठे ना कुठे पाहत असतो. एखाद्या कलाकृतीमध्ये स्वतःला पाहणे कोणत्याही कलाकृतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते. बॉलिवूडमध्ये आजवर अनेक असे चित्रपट येऊन गेले ज्यांची अनेक दशकानंतर सुद्धा चर्चा होते. चित्रपटसृष्टीत असे अनेक चित्रपट आजवर प्रसिद्ध झाले.

या चित्रपटातील पात्र सिनेरसिकांच्या मनावर गारुड करून आहेत. एखाद्या पात्रांमध्ये कलाकारांनी जीव ओतला तर ते पात्र पडद्यावर जिवंतपणाने उभं करता येतं. हे अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयातून सिद्ध करून दाखवले आहे. त्यांनी साकारलेली पात्र आणि त्या पात्राला त्या भूमिकेतून दिलेला प्रामाणिक न्याय प्रेक्षक वर्षानुवर्षे लक्षात ठेवतात. अशाच एका पात्राबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. असे एक पात्र जे अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांच्या लक्षात राहिले आहे, ते सुद्धा चित्रपट प्रदर्शित होऊन अनेक वर्ष उलटली तरीही.आज आपण अशाच एका चित्रपटाबद्दल चर्चा करणार आहोत, यातील एका पात्राने प्रेक्षकांच्या मनावर चांगलीच भुरळ पाडली होती. सिनेमा प्रदर्शित होऊन आज अनेक वर्षे लोटली, मात्र आजही सिनेरसिकांच्या मनावर जादूची क्रेझ आजही कायम आहे. ज्या चित्रपटाबद्दल आपण बोलत आहोत, तो चित्रपट म्हणजे कोई मिल गया. ऋतिक रोशन आणि प्रीती झिंटा यांच्या प्रमुख भूमिका असलेला चित्रपट प्रत्येक सिनेरसिकांच्या मनात आजही घर करून आहे.

या चित्रपटाचा जेव्हा जेव्हा विषय निघतो तेव्हा सर्वात जास्त चर्चा होते ती म्हणजे या चित्रपटातील जादू या पात्राची. जादू या पत्राने केवळ लहान मुलांनाच नव्हे तर सर्वच वयोगटातील सिनेरसिकांना आपल्या प्रेमात पाडले होते. जादू या पात्राविषयी लोकांच्या मनात आजही प्रेम कायम आहे. पण तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का? जादूची भूमिका या सिनेमात कोणी साकारली आहे. जादूच्या वेशभूषेच्या आत असणारी व्यक्ती कोण आहे? आज आम्ही तुम्हाला त्याच प्रसिद्ध कलाकाराची माहिती देणार आहोत या कलाकाराने जादू ची भूमिका साकारली होती.राकेश रोशन यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘कोई मिल गया’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला होता. सिने रसिकांकडून या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. त्यातील जादू हे पात्र तर अनेकांचे फेव्हरेट बनले होते. मात्र जादूची भूमिका कोणी साकारली आहे हे राकेश रोशन यांनी कधीही उघड केलं नव्हतं. मात्र आता या गोष्टीचा खुलासा झाला आहे.

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, 2003 झाली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात जादूची अत्यंत महत्त्वाची भूमिका होती. ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचे नाव आहे इंद्रवदन पुरोहित. मात्र एक दुःखाची गोष्ट म्हणजे इंद्रवदन आता या जगात नाहीत. 28 डिसेंबर 2014 रोजी त्यांचा मृत्यू झाला. मात्र मृत्यूनंतर त्यांच्या या भूमिकेबद्दल सर्वांना माहिती झाली. त्यांनी साकारलेल्या जादू या भूमिकेचा कॉस्ट्यूम ऑस्ट्रेलियात ऑर्डर देऊन बनवण्यात आला होता.
जादूने जी वेशभूषा साकारली होती, त्या वेशभूषेसाठी जो कॉस्ट्यूम तयार करण्यात आला होता. त्याची किंमत एक करोड रुपयांच्या जवळपास असल्याची माहिती मिळतेय. चित्रपट पाहताना ही भूमिका अतिशय साधी सोपी वाटत असली, तरी अशाप्रकारची वेशभूषा परिधान करून त्या भूमिकेला न्याय देणे अतिशय आव्हानात्मक असते. हे आव्हान इंद्रवदन यांनी अतिशय लीलया पेलले.

त्यांनी जादूच्या भूमिकेला पुरेपूर न्याय दिला. जादूची भूमिका साकारणारे इंद्रवदन यांनी सब टीव्हीवर येणाऱ्या बालवीर या मालिकेत सुद्धा काम केले आहे. त्यांनी बालवीर या मालिकेत डुबा डुबा हे पात्र साकारले होते. सब टीव्हीवरील बालवीर ही अतिशय लोकप्रिय अशी मालिका होती. तिचा दुसरा सिझन नुकताच पुन्हा सुरू करण्यात आला आहे. फक्त बॉलीवुडमध्ये नव्हे तर हॉलिवूडमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.

हॉलिवूडचा अतिशय प्रसिद्ध चित्रपट ‘लॉर्ड ऑफ द रिंग’ या चित्रपटात सुद्धा त्यांनी भूमिका साकारली आहे. आजवर मोजक्याच मात्र प्रेक्षकांच्या मनावर कायमस्वरूपी गारुड करणाऱ्या भूमिका साकारणाऱ्या इंद्रवदन पुरोहित यांनी बॉलीवूडमध्ये नव्हे तर हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली अशा या हरहुन्नरी अभिनेत्यांची माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा.