बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला एक महिन्यापेक्षा जास्त काळ झाला आहे. त्याचा शेवटचा चित्रपट दिल बेचारा २४ जुलै रोजी ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला. जो पाहिल्यानंतर अभिनेत्याच्या चाहत्यांच्या आठवणी ताज्या झाल्या. हा चित्रपट पाहिल्यानंतर सुशांतचे चाहते आणि मित्र सोशल मिडियावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. यादरम्यान बॉलीवूड अभिनेत्री कृती सेननने देखील चित्रपट पाहिल्यानंतर आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक इमोशनल पोस्ट शेयर केली आहे.कृती सेननने सुशांतचा शेवटचा चित्रपट दिल बेचारा पाहिला ज्यानंतर ती थोडी इमोशनल झाली. तिने एक व्हिडिओ शेअर करताना लिहिले कि, सुशांतचा चित्रपट पाहिल्यानंतर मी खचले आहे. चित्रपटामध्ये सुशांतची भूमिका मैनीमध्ये तिने खऱ्या अभिनेत्याला पाहिले. तो आयुष्यामध्ये असाच होता. चित्रपटामध्ये सेरी शब्दाचा वापर होतो. याचा अर्थ आहे ओके कृती सेनन लिहिते कि हे ओके नाही आहे. तुझे जाणे मी माझ्यामध्ये कधीच ठेऊ शकणार नाही. मैनेच्या रुपामध्ये मी तुला जिवंत पाहिले.
कृतीने पुढे लिहिले कि, असे अनेक सीन आले ज्यामध्ये मी तुला खऱ्या अर्थाने पाहिले. मला माहित आहे कि चित्रपटामध्ये कोणता सीन तू मनापासून साकारलास आणि सर्वात उत्कृष्ठ होता. तुझी शांतता जी मी चित्रपटामध्ये अनेक ठिकाण पाहिली. तू काहीच बोलला नाहीत पण मला जाणवले कि तू काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेस.कृती सेनन आणि सुशांत सिंह राजपूत एक चांगले मित्र होते. दोघे राबता चित्रपटामध्ये एकत्र पाहायला मिळाले होते. असे म्हंटले जाते कि सुशांत आणि कृती सेननने काही दिवस एकमेकांना डेट देखील केले होते. तथापि याची कधी पुष्टी झाली नाही. याआधी देखील कृती सेननने सुशांतसाठी अनेक पोस्ट लिहिल्या आहेत.
सध्या भले सुशांत आता आपल्यामध्ये नाही पण त्याच्या या शेवटच्या चित्रपटाने त्याला आपल्यामध्ये आणखीन काही दिवस आठवणीत ठेवण्याचे काम केले आहे. तर तुम्हाला दिल बेचारा चित्रपट कसा वाटला, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, त्याचबरोबर आमच्यासाठी काही सल्ला अवश्य द्या.
मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.