सुशांत राजपूत हे चांगले अभिनेता तर होतेच सोबतच ते एक उत्कृष्ट डान्सर होते. सुशांत सिंह राजपूतच्या आ*त्म*ह*त्या*ने प्रत्येकाला दुखी केले आहे. अभिनेत्याने गेल्या रविवारी आपल्या मुंबई येथील बांद्रा स्थित घरामध्ये ग*ळ*फा*स घेऊन आ*त्म*ह*त्या केली होती. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर सोशल मिडियावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. बॉलीवूडपासून मोठ-मोठ्या राजकारण्यांपर्यंत अनेकजण आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत आणि अभिनेत्याच्या अश्या जाण्याने शोक व्यक्त करत आहेत.अनेक लोकांनी सोशल मिडियाद्वारे अभिनेत्याला श्रद्धांजली दिली आहे. यादरम्यान सुशांत सिह राजपूची रूमर्ड एक्स गर्लफ्रेंड कृति सेननने सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीत आपल्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंटवर एक इमोशनल पोस्ट शेयर केली आहे या पोस्टमध्ये कृतीने सुशांतच्या मृत्यूवर शोक व्यक्त करताना खूप काही लिहिले आहे. आपल्या पोस्टमध्ये कृतीने लिहिले आहे, सुष, मला माहिती आहे तुझे प्रतिभाशाली मन तुझा सर्वात चांगला मित्र होता आणि सर्वात मोठा शत्रूदेखील. पण या गोष्टीने मी आतून पूर्णपणे खचले आहे कि तुला जगण्यापेक्षा मरणे सोपे वाटले होते.जर तुझ्याजवळ असे लोक असते जे तुझ्या या वाईट काळामध्ये तुझी मदत करू शकले असते आणि हा काळ सहजरित्या निघून गेला असता. जर तुझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना तू स्वतःपासून दूर केले नसते. जर तुझ्यामध्ये जे काही तुटले होते ते मला जोडता आले असते, पण असे करू शकले नाही. माझ्या हृदयाचा एक हिस्सा तुझ्यासोबत निघून गेला आहे आणि एकामध्ये तू नेहमी जिवंत राहशील. मी तुझ्या आनंदासाठी प्रार्थना करणे कधीही थांबवू शकत नाही.
सुशांतच्या मृत्यूनंतर कृती सेननला सोशल मिडियावर खूप ट्रोल केले जाऊ लागले आहे कि तिने अभिनेत्याच्या मृत्यूवर सोशल मिडियावर दुख व्यक्त केले नाही. तर दोघांनी एकत्र चित्रपट देखील केला होता आणि त्यांच्यामध्ये खूप चांगली बाँडींग देखील होती. कृती सेनन सुशांत सिंह राजपूतच्या अंतिम संस्काराला देखील उपस्थित राहिली होती. तिच्याशिवाय सुशांत सिंह राजपूतचे खास मित्र रिया चक्रवर्ती, श्रद्धा कपूर, वरुण शर्मा, मुकेश शेट्टी आणि क्रिस्टल डिसूजा सहित इतर अनेक स्टार्स देखील सामील झाले होते.मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.