साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शेट्टी बाहुबली सिरीजमध्ये देवसेनेची भूमिका करून खूपच लोकप्रिय झाली होती. अनुष्का शेट्टी आणि प्रभासची जोडी बाहुबली चित्रपटामध्ये खूपच पसंद केली गेली होती. या चित्रपटाच्या शुटींगदरम्यान दोघांच्या लिंकअपच्या अनेक वेळा चर्चा झाल्या होत्या.

चित्रपटाच्या प्रमोशनल इवेंटमध्ये देखील दोघांना एकत्र पाहून त्यांच्या अफेयरचा अंदाज लावला जात होता. या दोन्ही कलाकारांची ऑन अँड ऑफ स्क्रीन बॉन्डिंग इतकी जबरदस्त होती कि चाहते रियल लाईफमध्ये त्यांना एकत्र पाहून एक्साइटेड होते. तथापि दोन्ही कलाकारांनी नेहमी एकमेकांना एक चांगले मित्र असल्याचे सांगितले.

दोघांचे अजून लग्न झाले नसल्यामुळे त्यांच्यामध्ये अजूनदेखील बॉन्डिंग असल्याचा अंदाज लावला जातो. आता नुकतेच सुपरस्टार प्रभासचे नाव त्याची आदिपुरुष चित्रपटामधील को-स्टार कृति सेनॉनसोबत जोडले जात आहे. दोघांच्या लिंकअपच्या बातम्या सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यादरम्यान अभिनेत्री अनुष्का शेट्टीने असे पाऊल उचलले आहे ज्यामुळे चाहते दंग झाले आहेत.

वास्तविक प्रभास आणि कृति सेनॉनच्या डेटिंग रयूमर्स दरम्यान अभिनेत्री अनुष्का शेट्टी अनेक दिवसांनंतर इंस्टाग्रामवर परतली आहे. अनुष्का शेट्टी सोशल मिडियावर खूपच कमी सक्रीय असते. अनुष्का शेट्टी तिची शेवटची पोस्ट सुपरस्टार प्रभासचे काका कृष्णम राजू यांच्या निधनावेळी केली होती. याआधी अनुष्का शेट्टीने महिन्यापूर्वी आपली एक झलक चाहत्यांना इंस्टाग्रामद्वारे दिली होती. आता बाहुबलीची देवसेना महिन्यानंतर पुन्हा इंस्टाग्रामवर परतली आहे.

प्रभास आणि कृति सेनॉनच्या डेटिंगच्या चर्चांमध्ये अभिनेत्री अनुष्का शेट्टीने आपला एक नवीन इंस्टाग्राम डीपी पोस्ट केली आहे. अभिनेत्रीने आपल्या अरुंधति लुकमधील एक फोटो नवीन इंस्टाग्राम डीपीसाठी निवडला आहे. आता अभिनेत्रीच्या या निर्णयामुळे चाहते हैराण झाले आहेत. अभिनेत्रीचे चाहते अभिनेत्रीच्या डीपी बदलण्याच्या निर्णयाला प्रभास आणि कृति सेनॉनच्या डेटिंग रयूमर्सला जोडत आहेत. यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे. आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.