प्रत्येक आई-वडिलांचे स्वप्न असते कि आपल्या मुलीचे लग्न धुमधडाक्यात करावे आणि तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करावी. तुमच्या या स्वप्नाला पूर्ण करेल जीवन बीमा निगम (LIC) ची कन्यादान पॉलिसी, ज्याद्वारे तुम्ही दररोज १२१ रुपये जमा करून २७ लाख रुपये जमा करू शकता. चला तर जाणून घेऊया या पॉलिसीबद्दल.

एलआईसीची कन्यादान पॉलिसी जगातील पहिली अशी कन्यादान योजना आहे ज्यामध्ये वडील न राहिल्यास प्रीमियम घेतले जात नाही. पण कन्यादानचा पैसा दिला जातो. यासोबत शिक्षणाचा खर्च देखील याद्वारे दिला जातो. चला तर जाणून घेऊया कि पॉलिसीअंतर्गत तुम्ही दररोज १२१ रुपये जमा करून २७ लाख रुपये कसे जमा करू शकता.

पॉलिसीअंतर्गत जर तुम्ही दररोज १२१ रुपयेची बचत केली तर तुम्हाला २५ वर्षानंतर २७ लाख रुपये मिळतील. दररोज १२१ रुपये म्हणजे महिन्याचे एकूण ३६०० रुपये तुम्हाला भरावे लागतील. २७ लाख रुपये तुम्हाला २५ वर्षानंतर मिळतील पण पॉलिसीअंतर्गत तुम्हाल प्रीमियम २२ वर्षे भरावा लागेल. जाणून घेऊया पॉलिसीच्या इतर डिटेलबद्दल.

हे लक्षात ठेवा कि या पॉलिसीला तुम्ही तेव्हाच घेऊ शकता जेव्हा तुमचे वय ३० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असेल. यासोबत तुमच्या मुलीचे वय कमीत कमी एक वर्षे असायला हवे. याची खास गोष्ट हि आहे कि आपल्या गरजेनुसार तुम्ही कमी किंवा जास्त प्रीमियमचा प्लान घेऊ शकता. या पॉलिसीची इतर महत्वपूर्ण माहिती तुम्हाला एलआईसीच्या अधिकृत वेबसाईटवरून मिळेल.

एलआयसी कन्यादान पॉलिसी २०२० साठी अर्ज कसा करावा? या पॉलिसीअंतर्गत इच्छुक व लाभार्थी आपल्या जवळच्या एलआयसी कार्यालय व एलआयसी एजंटशी संपर्क साधू शकता. तुम्हाला तेथे जाऊन एलआयसी कन्यादान पॉलिसीमध्ये गुंतवणूक करायची आहे हे सांगावे लागेल.

तो तुम्हाला एलआयसी कन्यादान पॉलिसीची मुदत सांगेल, तुम्हाला तुमच्या उत्पन्नानुसार ती निवडावी लागेल, त्यानंतर एलआयसी एजंटला तुम्हाला त्याची सर्व माहिती आणि कागदपत्रे द्यावी लागतील, त्यानंतर तो तुमचा फॉर्म भरेल. अशा प्रकारे आपण एलआयसी कन्यादान पॉलिसी योजना २०२० मध्ये सामील होऊ शकता. योजनेशी संबंधित अधिक माहिती मिळविण्यासाठी आपण एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.

मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.