आज आम्ही तुम्हाला अशा ७ कलाकारांबद्दल सांगणार आहोत ज्यांचे आयुष्य रोहित शेट्टी मुळे बदलून गेले.
१) मुकेश तिवारी – मुकेश तिवारीने त्याच्या अभिनयाची सुरुवात १९९८ मध्ये प्रदर्शित झालेल्या चायना गेट या चित्रपटापासून केली होती. या चित्रपटात खतरनाक खलनायकाची भूमिका साकारली होती. त्यावेळी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला परंतु मुकेश यांना खरी ओळख दिली ती वसुली भाई या भूमिकेने, मुकेश यांच्या यशासाठी रोहित शेट्टीचा खूप मोठा हात आहे. मुकेश यांनी रोहित शेट्टीच्या गोलमाल सिरीज, चेन्नई एक्सप्रेस, संडे , जमीन यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

२) संजय मिश्रा – बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकारांमधील एक असलेले संजय मिश्रा यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात सत्या या चित्रपटापासून केली. रोहित शेट्टी मुळे संजय मिश्राचे नशीब चमकले. रोहितच्या गोलमाल सिरीज, दिलवाले, जमीन यांसारख्या चित्रपटांमध्ये संजयने काम केले आहे.

३) सिद्धार्थ जाधव – २००६ मध्ये प्रदर्शित झालेल्या गोलमाल मधील सत्तू सुपारी हे पात्र सर्वांच्याच लक्षात असेल. हे पात्र सिद्धार्थ जाधवने फार सुंदर सादर केले होते. सिद्धार्थला रोहित शेट्टीमुळे बॉलिवूडमध्ये एन्ट्री मिळाली. रोहित शेट्टीचा आधीचा चित्रपट सिंबा मध्ये सिद्धार्थ जाधवला एक वेगळीच भूमिका देण्यात आली होती. ती देखील सिद्धार्थने अगदी सहज व सुंदर रित्या साकारली.

४) अश्विनी कलसेकर – बॉलीवूड आणि टीव्ही सिरीयल मध्ये काम करणारे अश्विनी ही रोहित शेट्टी ची रेग्युलर ॲक्ट्रेस आहे. अश्विनी रोहित शेट्टीच्या गोलमाल रिटर्न्स, गोलमाल 3, गोलमाल अगेन, सिंघम रिटर्न्स आणि सिंबा या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

५) श्रेयस तळपदे – श्रेयस तळपदे त्याच्या फिल्मी करिअरची सुरुवात २००० मध्ये आलेल्या निदान या चित्रपटापासून केली होती. परंतु श्रेयस तळपदे त्याची खरी ओळख रोहित शेट्टीच्या चित्रपटांमुळे मिळाली. रोहित शेट्टीच्या प्रसिद्ध गोलमाल सीरिजमध्ये श्रेयस तळपदेनी काम केले होते. या सिरीयल मधील त्याचा अभिनय प्रेक्षकांना फार आवडला होता. यावर्षी श्रेयसचा सेटर्स हा चित्रपट प्रदर्शित झाला.

६) तुषार कपूर – बॉलिवूडचे सुपरस्टार धर्मेंद्र यांचा मुलगा तुषार कपूर त्याच्या फिल्मी करिअरची सुरुवात २००१ मध्ये आलेल्या मुझे कुछ कहना है या चित्रपटापासून केली होती. तुषार कपूरचे सोलो अभिनय असलेले चित्रपट फारसे चालत नाहीत परंतु रोहित शेट्टीच्या गोलमाल सिरीज मध्ये मात्र तूषारचा अभिनय वाखाणण्याजोगा होता. या सिरीज मुळे तूषारला खूप लोकप्रियता मिळाली होती.

७) अजय देवगण – ९० च्या दशकापासून बॉलीवूडमध्ये सुपरस्टार असलेल्या अजयचे नाव आजही त्या यादीत घेतले जाते. तुमचा विश्वास बसणार नाही पण अजयच्या यशा पाठी रोहित चा खूप मोठा वाटा आहे. अजयचा पाहिला १०० कोटी पार केलेला चित्रपट सिंघम आणि २०० कोटी पार केलेला गोलमाल अगेन हे चित्रपट रोहितने च बनवले होते.