बॉलीवूड अभिनेता इरफान खानचे आज मुंबई येथील कोकिलाबेन हॉस्पिटल मध्ये निधन झाले. बऱ्याच काळापासून ते कॅन्सरशी झुंज देत होते. इरफान खान यांच्या या लढाईमध्ये त्यांची पत्नी सुतापा सिकंदर त्यांच्यासोबत बरोबरीने उभी होती. इरफान खान आजारी पडल्यानंतर आपल्या पत्नीला म्हणाले होते कि जर मला जगण्याची आणखीन एक संधी मिळाली तर मी तुझ्यासाठीच जगेन. तथापि इरफान खानला हि संधी मिळाली नाही आणि ते आपली पत्नी आणि कुटुंबाला सोडून निघून गेले.

इरफान खान आपल्या उत्कृष्ठ अभिनयासाठी ओळखले जातील. कलाकार ते दिग्दर्शकापर्यंत, इरफानबरोबर ज्यानेही एकत्र काम केले त्यांचे खूपच कौतुक झाले. इरफान एका चांगल्या कुटुंबाशी संबंधीत होते. असे असूनही ते आपला मार्ग स्वतः निवडण्यावर विश्वास ठेवत होते. इरफानने आपल्या पसंतीचे प्रोफेशन निवडले आणि इथेच त्यांना त्यांची जीवनसाथी देखील मिळाली.दिल्ली येथील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये ऑडिशन देण्याची संधी त्यांना मिळाली. इरफान खान यांना जाणीव झाली होती कि हेच त्यांचे ध्येय आहे आणि ते आपले नशीब अजमावण्यासाठी दिल्लीला आले. इथेच त्यांची भेट सुतापासोबत झाली. सुतापासुद्धा तिथे अभिनय शिकण्यासाठी आली होती पण तिला स्क्रीनप्ले राइटिंग शिकायचे होते.सुतापा पहिल्याच नजरेमध्ये इरफानला आवडली होती. इरफानने संकोच करत आपला परिचय दिला आणि हळू हळू त्यांची हि ओळख मैत्रीमध्ये बदलली. दोघांमध्ये बरेच काही कॉमन होते आणि एकमेकांकडे ते आकर्षित होऊ लागले होते. शेवटी दोघांनी एकमेकांच्या प्रेमाची कबुली दिली. इरफान आणि सुतापा दोघेही आपल्या करियर प्रती खूपच गंभीर होते आणि दोघांनाहि स्वतःची एक ओळख बनवायची होती. करियरबद्दल दोघांमध्ये इतका दृढनिश्चय होता कि त्यांनी लग्न देखील टाळण्याच्या निर्णय घेतला होता.१९९५ पर्यंत इरफान आणि सुतापाला इंडस्ट्रीमध्ये एक ओळख मिळू लागली होती आणि हीच ती वेळ होती जेव्हा दोघांनी आपल्या नात्याला पुढच्या पायरीवर घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. १९९५ मधील फेब्रुवारीमध्ये दोघांनी कोर्ट मॅरेज केले आणि पती-पत्नी म्हणून आपल्या एका नव्या आयुष्याची सुरवात केली. असे म्हंटले जाते कि इमानदार पार्टनरच परफेक्ट पार्टनर असतो आणि हि गोष्ट सुतापा आणि इरफान यांच्यावर तंतोतंत फिट बसते. हे दोघे एकमेकांच्या सर्वात मोठे फॅन आणि प्रशंसक देखील होते.इरफान आणि सुतापा यांनी बनेगी अपनी बात या टीव्ही सिरीयल मध्ये एकत्र काम केले आहे. सुतापा या सिरीयलची स्क्रीनप्ले राइटरसुद्धा होती आणि इरफानने यामध्ये उत्कृष्ठ अभिनय सादर केला होता. हि सिरीयल ९० च्या दशकामधील सुपरहिट सिरियल्सपैकी एक होती. एकदा इरफान खानने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते कि आपल्या पत्नीच्या शिस्तीमुळे आणि प्रोत्साहनामुळे त्याला चांगले करण्याची नेहमी प्रेरणा मिळाली आहे.इरफानने सांगितले होते कि, आम्ही एकाच फिल्म स्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि बऱ्याच गोष्टींमध्ये माझ्या पत्नीची समज माझ्यापेक्षा खूपच चांगली आहे. तिच्यामध्ये खूपच रचनात्मक ऊर्जा आहे ज्यामुळे त्याची सुंदर झलक चित्रपटांमध्ये आणि तिच्या स्टोरीमध्ये पाहायला मिळते. इरफान आपल्या पत्नीचे कौतुक करताना हे देखील म्हणाले होते कि तिच्याबद्दल काय सांगू? ती माझ्यासाठी ७ दिवस २४ तास उभी राहिली. माझी देखभाल केली आणि तिच्यामुळे मला खूप मदत मिळाली. मला तिच्यासाठी जगायचे आहे.