शिखर धवनची रोमांचक लव्हस्टोरी, केले दोन मुलाच्या आई सोबत लग्न अशी आहे या क्यूट कपलची Love Story ! आयसीसी वन डे टूर्नामेंटमध्ये वेगवान एक हजार रन्स पूर्ण करणारा टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन सध्या चांगलाच फॉर्ममध्ये आहे. त्याच्या खेळाचं सगळीकडून कौतुक केलं जात आहे. त्याने नेहमीच टीम इंडियाला विजयाच्या दारात आणून ठेवले तर अनेकदा विजयात मोठं योगदान दिलं. शिखर धवनचा टीम इंडियातील प्रवास जसा खूपच रोमांचक आहे, तशी त्याची लव्हस्टोरीही खूप रोमांचक आहे. ऑस्ट्रेलियातील एका भारतीय वंशाच्या तरुणीशी त्याने लग्न केलं. खरंतर या दोघांची ओळख फेसबुकवरून झाली. पाहता पाहता दोघांचं प्रेम जुळलं आणि पाहता पाहता दोघांनी संसार थाटण्याचा निर्णय घेतली. महत्वाची गोष्ट म्हणजे शिखरची पत्नी ही बॉक्सर आहे. या दोघांची लव्हस्टोरी ही एखाद्या सिनेमाच्या कथानकाला शोभावी असीच आहे. प्रेम एक सुखद अनुभव असतो. ज्यामध्ये वय, जात, धर्म काहीच पाहिलं जात नाही. भारतीय क्रिकेट टीमचा खेळाडू शिखर धवन याच्याबाबतीत देखील असंच म्हणता येईल. कारण त्याला ज्या महिलेवर प्रेम झालं ती महिला त्याच्या पेक्षा 7 वर्षाने मोठी आहे. ऐवढंच नाही तर त्या महिलेचा घटस्फोट झाला असून तिला 2 मुलं देखील आहे. खरंच प्रेम अशी गोष्ट असते की व्यक्ती ज्या व्यक्तीवर प्रेम करतो तिला तो जशी आहे तशी स्विकारतो. शिखर धवन आज क्रिकेटच्या दुनियेतला असा खेळाडू आहे ज्याला सगळेच जण ओळखतात. पण त्याच्या पर्सनल लाईफमध्ये देखील त्याने असं काही केलं आहे की तुम्ही देखील हैराण व्हाल.धवनने 2 मुलांनी आई आणि 7 वर्ष मोठ्या महिलेशी विवाह का केला असा प्रश्न तुम्हाला ही पडला असेल. आज अनेक मुलांची अशी इच्छा असते की त्याच्या होणाऱ्या पत्नीचा आधी कोणीच बॉयफ्रेंड नसावा. पण शिखर धवनने अशा महिलेशी लग्न केलं जी आधीच विवाहित होती. शिखरने भारतीय वंशाच्या आयशा मुखर्जीसोबत विवाह केला आहे. ती लहानपणापासूनच ऑस्ट्रेलियामध्ये राहत होती. आयशाचे वडील बंगाली आणि आई ऑस्ट्रेलियन आहे. आयशाचा जन्म भारतात झाला आहे. जेव्हा ती लहान होती तेव्हा तिचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला स्थायिक झाले. आयशा मुखर्जी अनेक प्रकारच्या खेळांमध्ये अव्वल होती. आयशाने रिंग बॉक्सिंग, टेनिस आणि क्रिकेट देखील खेळली आहे. आयशाला क्रिकेट खूप आवडतं. क्रिकेट वरच्या प्रेमामुळेच तिची भेट शिखर धवनसोबत झाली.

आयशा आणि शिखर फेसबूकवर मित्र झाले. त्यानंतर त्यांची भेट झाली आणि मग लव्ह स्टोरी सुरु झाली. फेसबूकवर आयशा हरभजन सिंगची म्यूचुअल फ्रेंड होती. त्यानेच या दोघांची ओळख करुन दिली. हळूहळू दोघांमध्ये गप्पा सुरु झाल्या. यानंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. जेव्हा दोघे एकमेकांच्या जवळ आले तेव्हा आयशाचा घटस्फोट झाला होता आणि तिला 2 मुलं देखील होती. पण शिखरला याबाबत कोणतीच हरकत नव्हती. शिखर आणि आयेशाने 2009 साली साखरपुडा केला. मात्र शिखरला भारतीय संघात स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं होतं. खेळावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी शिखरने लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आयेशा आणि शिखर 2012 साली विवाह बंधनात अडकले. 2012 साली लग्न झाल्यानतंर आयेशाने 2014 साली मुलाला जन्म दिला. आयेशा शिखरच्या अनेक सामन्यांनाही उपस्थित असते. मात्र आयेशाला ऑस्ट्रेलिया ते भारत आणि भारत ते ऑस्ट्रेलिया असा प्रवास आजही करावा लागतो. 32 वर्षाच्या शिखरने 2012 मध्ये आयशा सोबत विवाह केला. आयशाच्या प्रेमामुळे शिखर एक जबाबदार व्यक्ती बनला. धवन नेहमी म्हणतो की, आयशाने त्याचं जीवन पूर्णपणे बदललं. त्याला खूप काही शिकवलं. धवन म्हणतो की ‘जेव्हा तो चांगली कामगिरी नाही करत तेव्हा त्याला कोच पेक्षा त्याच्या पत्नीची भीती वाटते.’