भारतातील सर्वात कमी वयाचा IPS अधिकारी बनण्याचा मान मुलाने पटकावला !

3 Min Read

पूर्ण मनापासून जर का कोणत ही काम आपण केलं तर जगात अशी कोणतीच गोष्ट नाही जी करणे अशक्य आहे. प्रत्येक जण हा सुखी राहण्यासाठी, आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडत असतो. फार कमी असे लोक असतात, ज्यांना खूप कमी वयातच त्यांचा प्रयत्नांना यश मिळत, त्याचप्रमाणे या 22 वर्षाच्या मुलाचा प्रयत्नांना यश मिळालं आणि तो बनला देशातील पहिला कमी वय असलेला IPS ऑफिसर. तर पाहूया त्याचा या प्रवासाची गोष्ट.

यू. पी. एस. सी. च्या परीक्षेत पास होऊन भारतीय प्रशासनिक सेवा अधिकारी किंवा भारतीय पोलीस सेवेत रुजू होण्याचे आजकालचा युवा वर्गाचा प्रयत्न असतो आणि यशस्वी होण्याची प्रत्येकाची एक वेगळी गोष्ट असते. तशीच एक गोष्ट आहे साफिन हसन यांची. 2017 मध्ये यूपीएससी परीक्षेमध्ये 570 वी रँक मिळवून अवघ्या 22 व्या वर्षी आईपीएस ऑफिसर बनले. अनेक अडचणींवर मात करत साफिन हसन यांनी आपलं लक्ष्य प्राप्त केलं आणि ते जामनगर येथे आईपीएस अधिकारी म्हणून रुजू झाले. 23 डिसेंबरपासून त्यांनी पोलीस अधिक्षक या पदाचा कार्यभार हाती घेतला.
साफिन हसन हे सुरत येथे राहणारे आहेत. त्यांचे आई बाबा हिऱ्याचा एका कंपनीत काम करतात. एकदा जेव्हा साफिन शाळेत होते तेव्हा त्यांचा शाळेत कलेक्टर आले होते. साहजिकच त्यांना सर्वजण मान सन्मानाने वागवत होते. याचे साफिन यांना आश्चर्य वाटले आणि याबद्दल त्यांनी त्यांचा मावशीला विचारणा केली. तेव्हा त्यांची मावशी त्यांना म्हणाली की कलेक्टर हा एखाद्या जिल्ह्याचा जणू राजा असतो. खूप मन लावून अभ्यास केल्यास कलेक्टर बनू शकतो आणि हे ऐकून साफिनने कलेक्टर बनण्याचे प्रयत्न सुरु केले.

साफिन यांना लहानपणापासूनच अभ्यासाची आवड होती. सोबतच इतर स्पर्धा व कार्यक्रमांमध्येही त्याचा सहभाग असे. 11 वी मध्ये असतानाच त्यांनी इंग्रजी शिकायला सुरुवात केली होती. साफिन यांचे 2000 साली नवीन घर तयार होत होते तर त्याचा आई बाबांनी ते घर मोलमजुरी करून पूर्ण केले. रात्रीच्या वेळेस ते घर बांधणीसाठी विटा आणत असतं. आई वडिलांचे कष्ट बघून त्यांना फार वाईट वाटतं असे आणि तो म्हणत असे आई वडिलांचा या कष्टाचं मी सार्थक करीन.
बेरोजगारीमुळे त्यांचा आई वडिलांची नोकरी गेल्यामुळे घर चालवण्यासाठी त्यांचे वडील घरांमध्ये इलेक्ट्रीशियनचे काम करत असतं. सोबतच रात्रीच्या वेळेस अंडी आणि ब्लैक टी याचे छोटे दुकान चालवत असतं. तर आई घरोघरी जाऊन घरकाम करत असे. आई वडिलांचा या कष्टाची जाण ठेवून मनापासून अभ्यास करून आज साफिन हसन हे कलेक्टर झाले आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *