बॉलीवूड फिल्मी जगतामध्ये आपली खास ओळख निर्माण करून जगाचा निरोप घेणाऱ्या दिवंगत अभिनेता इरफान खानच्या मदारी चित्रपटाला प्रदर्शित होऊन ४ वर्षे पूर्ण झाली आहे. या सोशल थ्रिलर चित्रपटाला खूपच पसंत केले गेले होते. चित्रपटामध्ये इरफान खान गृहमंत्रीचा १० वर्षाचा मुलगा रोहनला हॉस्टेल मधून किडनॅप करतो. चित्रपटामध्ये रोहन गोस्वामी या मुलाची भूमिका अभिनेता विशेष बंसलने साकारली होती.क्युट दिसणाऱ्या विशेषने मदारीमध्ये आपल्या अभिनयाने लोकांच्या मनामध्ये एक खास जागा निर्माण केली होती. आता मदारीमधील हा मुलगा मोठा झाला आहे. विशेष बंसल सोशल मिडियावर खूपच अॅलक्टिव असतो आणि आपले फोटो नेहमी तो चाहत्यांसोबत शेयर करत असतो. विशेषचे लेटेस्ट फोटो पाहून कोणीही म्हणणार नाही कि हा तोच मुलगा आहे ज्याने मदारी चित्रपटामध्ये काम केले आहे.विशेष आता खूप यंग आणि स्टाईलिश दिसत आहे. विशेषने मदारी चित्रपटापूर्वी अनेक टीव्ही शोजमध्ये काम केले होते. तो टीव्हीवरील एक लोकप्रिय चेहरा आहे. विशेषला त्याच्या उत्कृष्ठ अभिनयासाठी अवॉर्ड्सदेखील मिळाले आहेत. त्याला इंडियन टेली अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट बाल अभिनेता पुरस्कार मिळाला होता.
विशेष बंसलने बालकलाकार म्हणून अनेक शोजमध्ये काम करून खूपच लोकप्रियता मिळवली. त्याने आपल्या क्यूटनेस आणि जबरदस्त अभिनयाने लोकांचे मन जिंकले. विशेष इस प्यार को क्या नाम दूं, देवों के देव महादेव, होंगे जुदा ना हम, बुद्धा, बेइंतहा, सूर्यपुत्र कर्ण आणि कुछ रंग प्यार के ऐसे भी सारख्या सिरियल्स मध्ये देखील पाहायला मिळाला आहे. विशेषने ये मेरी फॅमिली आणि असुर वेब सीरीजमध्ये देखील काम केले आहे. मदारी चित्रपटापूर्वी तो बॉम्बे टॉकीज चित्रपटामध्ये दिसला होता.मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.