बॉलीवूडमध्ये अनेक कलाकार असे आहेत ज्यांनी पडद्यावर आपल्या अदाकारीने लोकांचे मन जिंकले, पण ते कधीच एकत्र दिसले नाहीत. यामध्ये सर्वात पहिले नाव बॉलीवूडचा महानायक अमिताभ बच्चन आणि धक-धक गर्ल माधुरी दीक्षितचे येते. अमिताभ आणि माधुरी बडे मिया छोटे मिया चित्रपटामधील ओये मखना गाण्यामध्ये पाहायला मिळाले होते. हे गाणे चांगलेच सुपरहिट झाले होते, पण तरीही अमिताभ आणि माधुरी कोणत्याही चित्रपटामध्ये एकत्र दिसले नाहीत. शेवटी कोणताही वाद नसताना हे सुपरस्टार कधीच एकत्र का दिसले नाहीत.

हे होते दोघांचे एकत्र काम न करण्याचे कारण :- वास्तविक माधुरीने ८० च्या दशकामध्ये डेब्यू केले होते. सुरुवातीमध्ये माधुरीच्या चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळाला नाही. तर अमिताभ तेव्हा एक मोठे स्टार बनले होते. माधुरी आपल्या सफलतेचा मार्ग शोधत होती आणि तिचा शोध संपला अनिल कपूरसोबत. अनिलसोबत माधुरीने बेटा, तेजाब, हिफाजत, परिंदा सारखे सुपरहिट चित्रपट दिले. दोघांची जोडी सुपरहिट झाली आणि माधुरी मोठी स्टार बनली.अशामध्ये जेव्हा माधुरीला जेव्हा अमिताभसोबत काम करण्याची संधी मिळाली तेव्हा अनिल कपूरने मनाई केली. असे म्हंटले जाते कि त्या दिवसांमध्ये अनिल कपूर माधुरीबद्दल खूप पजेसीव होता. एक तर तो माधुरीला पसंत करत होता आणि दुसरे म्हणजे पडद्यावर तो आपली आणि माधुरीची जोडी सुपरहिट बनवून ठेऊ इच्छित होता. अशामध्ये माधुरीने देखील अमिताभसोबत कोणताही चित्रपट केला नाही.

अनिलपासून देखील दूर झाली माधुरी :- आश्चर्याची बाब म्हणजे, माधुरीसोबत हे एकदाच झाले नाही तर अमिताभ शिवाय सनी देओल सोबत देखील माधुरीची जोडी एक वेळ सोडून कधीच जमली नाही. माधुरी आणि सनीने त्रिदेव चित्रपटामध्ये एकत्र काम केले होते जी पडद्यावर खूप पसंत केली गेली.

सनी आणि माधुरीची केमेस्ट्री देखील लोकांना खूप पसंत आली, पण असे फक्त एकदाच होऊ शकले. यामागचे कारण देखील अनिल कपूरच होता. त्या दिवसामध्ये अनिल आणि सनीमध्ये नंबर वन बनण्याची स्पर्धा सुरु होती आणि यामुळे बोनी कपूर आपला भाऊ अनिल कपूरला हिट करण्यासाठी त्याला माधुरीसोबत कास्ट करत असे.असे देखील म्हंटले जाते कि या सर्व गोष्टींमुळे माधुरी खूप अस्वस्थ झाली होती आणि हेच कारण होते कि तिने अनिलपासून दूर जाण्यास सुरुवात केली होती. दोघांनी एकत्र काम करणे बंद केले होते. नंतर अनेक वर्षांनी अनिल आणि माधुरीने टोटल धमाल चित्रपटामध्ये एकत्र काम केले.

तथापि बड़े मियां छोटे मिया चित्रपटानंतर अमिताभ आणि माधुरी कधीच एकत्र दिसले नाहीत. या चित्रपटामध्ये देखील दोघांनी फक्त एका गाण्यासाठी एकत्र काम केले होते. याशिवाय केबीसीच्या एका सीजनमध्ये माधुरी अमिताभची पाहुनी बनून आली होती आणि लोकांना त्यांची जुगलबंदी खूपच पसंत आली होती.

करियरबद्दल बोलायचे झाले तर अमिताभ बच्चन ब्रेक न घेता सतत चित्रपटामध्ये दिसत आहेत. अमिताभ सध्या आयुष्मान खुरानासोबत गुलाबो-सिताबो चित्रपटामध्ये पाहायला मिळाले होते. यानंतर रनबीर कपूर आणि आलिया सोबत ब्रह्मास्त्र चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहेत. तर दुसरीकडे माधुरी दीक्षित कलंक चित्रपटामध्ये शेवटची पाहायला मिळाली होती. तथापि हा चित्रपट पडद्यावर जास्त बिजनेस करू शकला नाही.

मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.