बॉलीवूड अभिनेत्री महिमा चौधरीची मुलगी दिसते तिच्याहीपेक्षा जास्त सुंदर, पहा फोटो !

2 Min Read

महिमा चौधरी तिच्या काळातील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक होती. मात्र महिमा बऱ्याच काळापासून चित्रपटांपासून दूर आहे. महिमाने १९९७ मध्ये परदेस या चित्रपटामधून आपल्या करियरची सुरवात केली होती. महिमा अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जिने बोल्ड सीन न देता आपल्या अॅयक्टिंगने बॉलीवूडमध्ये स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. महिमा अनेक सुपरहिट चित्रपटांचा भाग राहिली आहे. आज आम्ही तुम्हाला महिमाच्या मुलीबद्दल सांगणार आहोत जी तिच्याहीपेक्षा खूप सुंदर आहे.

जाणून घ्या महिमाच्या मुलीबद्दल :- खूप सुंदर असूनदेखील महिमा चौधरी बॉलीवूडमध्ये काही कमाल दाखवू शकली नाही. सतत फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर तिला काम मिळणे बंद झाले. ज्यानंतर ती बॉलीवूडपासून दूर राहू लागली. महिमाच्या मुलीचे नाव अर्याना चौधरी आहे. अर्याना हुबेहूब तिची आई महिमासारखी दिसते. महिमाने एका मुलाखतीमध्ये सांगितले कि तिच्या मुलीला मोठे होऊन अभिनेत्री बनायचे आहे. सध्या ती शिकत आहे.१३ सप्टेंबर १९७३ रोजी दार्जिलिंगमध्ये जन्मलेल्या महिमाला सुभाष घईने आपला चित्रपट परदेस मधून बॉलीवूड मध्ये लाँच केले होते. पहिल्या चित्रपटामध्ये तिला शाहरुख खानसारख्या दिग्गज अभिनेत्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. हा चित्रपट सुपरहिट झाला होता आणि या चित्रपटासाठी तिला बेस्ट डेब्यू फीमेल चा फिल्मफेयर अॅतवॉर्ड देखील मिळाला होता.

महिमाने २००६ मध्ये बॉबी मुखर्जी सोबत लग्न केले. लग्नाच्या अवघ्या ७ वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर महिमा सिंगल मदर बनून आपल्या मुलीची देखभाल करत आहे. महिमाची मुलगी खूपच क्यूट आणि सुंदर आहे.महिमाने कुरुक्षेत्र, धड़कन, खिलाड़ी ४२०, दाग, लज्जा, ये तेरा घर ये मेरा घर, ओम जय जगदीश आणि दिल है तुम्हारा सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. यातील बहुतेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *