सलमान खान आणि भाग्यश्री अभिनित चित्रपट मैने प्यार किया कोण विसरू शकतो. चित्रपटामध्ये सलमानसोबत भाग्यश्रीच्या केमिस्ट्रीला दर्शकांद्वारे खूपच प्रेम मिळाले होते. पण सूरज बड़जात्याच्या या चित्रपटाच्या शुटींग दरम्यान भाग्यश्री आधीच हिमालय दासानीला डेट करत होती. विशेष बाब हि होती कि मैने प्यार किया च्या शुटींग दरम्यान सलमानला हे सर्व माहित असून देखील तो तिच्यासोबत फ्लर्ट करायचा.

एका वेबपोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाग्यश्रीने खुलासा केला आहे कि सलमान खानला सर्वात पहिला हिमालयसोबतच्या माझ्या रिलेशनबद्दल दिल दीवाना या गाण्याच्या सेटवर माहिती झाले होते. तो माझ्या मागे येत होता आणि माझ्या कानामध्ये गाणे म्हणायचा. तेव्हा मी त्याला चेतावणी द्यायचे कि लोक आपल्याबद्दल चर्चा करायला सुरु करतील. अर्ध्या दिवसापर्यंत मला त्रास दिल्यानंतर तो मला म्हणाला कि मला हिमालय बद्दल सर्व माहिती आहे. त्याने हेसुद्धा सांगितले कि मी हिमालयला लोकेशनवर बोलवते.आजकाल जेव्हा क्लासिक चित्रपटांचा रिमेक बनवला जात आहे, अशामध्ये जेव्हा भाग्यश्रीला तिच्या चित्रपटाबद्दल विचारले गेले तेव्हा तिने सांगितले कि, आलिया भट्ट, हि खूपच उत्कृष्ठ अभिनेत्री आहे, तिने उडता पंजाब मध्ये उत्कृष्ठ अभिनय केला होता. तर सलमानच्या भूमिकेमध्ये रणबीर कपूर किंवा रणवीर सिंह यामधील कोणतर असायला हवे. हे इतके टैलेंटेड आहेत कि त्यांच्या समोर जूनियर असल्यासारखे वाटते.
भाग्यश्रीने मैंने प्यार किया नंतर हिमालयसोबत लग्न केले होते. दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. सध्या या दोघांचा मुलगा अभिमन्युने मर्द को दर्द नहीं होता या चित्रपटामधून बॉलीवूड मध्ये डेब्यू केला आहे, ज्यानंतर तो लवकरच निकम्मा चित्रपटामध्ये दिसणार आहे.