मलायका अरोराने अर्जुन कपूरसोबत एक रोमँटिक फोटो शेयर केला आहे. या फोटोमध्ये अर्जुनने मलायकाला मिठी मारली आहे आणि दोघे हसत आहेत. हा व्हिडिओ धर्मशाळाचा आहे जेव्हा मलायका, अर्जुनसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी तेथे गेली होती. या फोटोला शेयर करताना मलायकाने लिहिले जेव्हा तुम्ही एकत्र होते तेव्हा कोणताही क्षण खराब होत नाही.

मलायकाच्या या पोस्टवर चाहत्यांसोबत सेलेब्सदेखील या जोडीचे कौतुक करत आहेत. अर्जुनचे काका संजय कपूरने या पोस्टमध्ये हृदय जिंकणारी इमोटिकॉन पोस्ट केली आहे. तर अर्जुनने देखील या पोस्टवर कमेंट केली आहे आणि लिहिले आहे कि मी तुझ्या गोष्टीशी सहमत आहे.

मलायका आणि अर्जुन गेल्या बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. काही दिवसांपूर्वी चाहत्यांसोबत बातचीत दरम्यान अर्जुनला विचारले गेले होते कि तो मलायकासोबत लग्न कधी करणार आहे? अर्जुनने जेव्हा म्हंटले कि मी जेव्हा लग्न करेन तेव्हा सांगेन.

लग्नाबाद्द्ल सध्या कोणतीही योजना नाही आणि जर मी आता लग्न करण्याच्या निर्णय घेतला तरी ते यावेळी शक्य नाही. आम्ही दोघांनी अजूनपर्यंत लग्नाबद्दल विचार केलेला नाही. पण जसे मी नेहमी सांगत असतो कि मी जेव्हा लग्न करेन तेव्हा सांगेन. आम्ही काहीच लपवणार नाही, तर सर्वाना सांगून लग्न करणार आहे.

याशिवाय अर्जुनने चाहत्यांना विचारले कि मलायका बाकी लोकांपेक्षा वेगळी कशी आहे. यावर अभिनेत्याने उत्तर दिले होते कि तुम्ही जेव्हा एखाद्यावर प्रेम करता तेव्हा याचे उत्तर देणे खूपच अवघड असते कारण फक्त एकच गोष्ट त्यांना दुसऱ्यांपेक्षा वेगळे बनवत नाही. तर अनेक गोष्टी असतात.

मला वाटते कि मलायका मला समजून घेते. मी एक असा व्यक्ती आहे ज्याच्यासोबत राहणे खूपच कठीण होऊ शकते. मी एकदम आरामशीर राहू शकत नाही. अशामध्ये मलायकाचा संयम ठेवणे तेही माझ्यासोबत माझासाठी खूप मोठी गोष्ट आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.