बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर याने नुकताच आपल्या वाढदिवस साजरा केला आहे. त्याचा ३५ वा वाढदिवस होता. या निमित्ताने त्याच्यावर चाहत्यांकडून, इंडस्ट्रीमधील जवळच्या लोकांकडून, मित्र आणि प्रियजनांकडून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. सर्वांनी आपल्या आपल्या अंदाजामध्ये अर्जुनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर यासर्वांमध्ये अर्जुनला एक खास व्यक्तीने देखील भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत आणि हि व्यक्ती कोणी दुसरी नसून त्याची गर्लफ्रेंड मलाइका अरोडा आहे. मलाइकाने सोशल मिडियावर पोस्ट शेयर करून अर्जुनला विश केले आहे.खरेतर मलाइका अरोड़ाने अर्जुन कपूरला ३५ व्या वाढदिवशी आपल्या इंस्टाग्रामवरुन स्टोरीद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. तिने आपल्या इंस्टा स्टोरीमध्ये दोन दोन फोटो शेयर केले आहेत. एका फोटोमध्ये मलाइका-अर्जुन कोणत्यातरी महिलेसोबत दिसत आहेत. मलाइकाने अर्जुन आणि या महिलेला बर्थडे ट्विन म्हंटले आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये फक्त अर्जुन कपूर आहे. या फोटोवर मलाइकाने लिहिले आहे – हॅपी बर्थडे माय सनशाइन. या फोटोमध्ये अर्जुन कपूर हसताना पाहायला मिळत आहे.अर्जुनच्या वाढदिवशी मलाइकाची विश करण्याची हि पद्धत लोकांना खूपच पसंत येऊ लागली आहे आणि इंस्टा स्टोरीवर शेयर केला गेलेला हा फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. मलाइका अरोड़ाने अर्जुन कपूरचा मागचा वाढदिवस देखील खास अंदाजामध्ये साजरा केला होता. तिने अर्जुन कपूरसोबत आपला एक फोटो शेयर केला होता, ज्यामध्ये हे दोघे हात पकडून रोमँटिक अंदाजामध्ये पाहायला मिळत होते.मलाइका अरोड़ा आणि अर्जुन कपूर आपल्या रिलेशनशिपमुळे नेहमीच चर्चेमध्ये राहत असतात. या दोघांनी अनेक मुलाखतींमध्ये आपल्या नात्याची कबुली दिली आहे पण लग्नाच्या बाबतीत अजून दोघांनी मौन बाळगले आहे. अर्जुन आणि मलाइकाने हे साफ केले आहे कि दोघे रिलेशनशिपमध्ये जरूर आहेत पण त्यांना लग्नाची अजून घाई नाही.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.