मल्याळम चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते मोहनलाल यांचा जन्म २१ मे १९६० मध्ये केरळच्या एलनथूर मध्ये झाला होता. अभिनेत्याबरोबर ते एक प्रोड्यूसर, सिंगर आणि थिएटर आर्टिस्ट देखील आहेत. मोहनलाल मल्याळम चित्रपटामधील एक मोठे नाव आहेत. त्यांचे वडील विश्वनाथन नायर एक मोठे वकील होते. त्यांचे शिक्षण तिरुवनंतपुरम मध्ये झाले आहे. लहानपणापासूनच मोहनलाल यांना कलेची आवड होती. ते नाटका मध्ये भाग घेत असत.मोहनलाल यांचा चित्रपट प्रोडक्शन आणि डिस्ट्रीब्यूशन शिवाय रेस्टोरंट आणि मसाला पॅकेजिंगचा बिजनेस देखील आहे. त्यांना साउथचे अंबानीसुद्धा म्हंटले जाते. मोहनलाल यांचा दुबई येथील बुर्ज खलिफामध्ये एक फ्लॅट आहे. त्यांचे घर बिल्डिंगच्या २९ व्या मजल्यावर आहे. त्यांनी हे घर २०११ मध्ये खरेदी केले होते. मोहनलाल जवळ मर्सिडीज बेंज, बीएमडब्ल्यू, जगुआर आणि रेंज रोवर सारख्या अनेक अलिशान गाड्या आहेत.
त्यांची लाइफस्टाईल एखाद्या राजा महाराजापेक्षा काही कमी नाही आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्यांनी सर्व आपल्या मेहनतीने मिळवले आहे. मोहनलाल यांचा पहिला चित्रपट तसे तर थिरनोत्तम होता जो १९७८ मध्ये बनला होता पण सेंसर बोर्डच्या आपत्तिमुळे तो कधीच रिलीज झाला नाही. यांनंतर त्यांना पहिल्यांदा १९८० मध्ये मंजिल विरिन्जा पूक्कल या चित्रपटामधून सफलता मिळाली. या चित्रपटामध्ये ते विलनच्या भुमिकेमध्ये पाहायला मिळाले होते. हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट झाला होता. या चित्रपटा पासून मोहनलाल यांचे सफल करियर सुरु झाले.
त्यांच्या वाढत्या लोकप्रियतेचे हे कारण होते कि, १९८२ ते १९८६ च्या दरम्यान त्यांचे चित्रपट दर १५ दिवसांनी रिलीज होत होते. १९८३ मध्ये त्यांनी २५ पेक्षा आधिक चित्रपटात काम केले होते. १९८६ हे त्यांच्यासाठी चांगल्या वर्षापैकी एक वर्ष होते. राजविंटे मकन या चित्रपटात त्यांनी डॉनची भूमिका साकारली होती जी सर्वांच्या मनात आजदेखील तशीच आहे.
२०१२ मध्ये मोहनलाल यांना वर्ल्ड ताइक्वांडो कडून ब्लॅक बेल्टने सन्मानित केले गेले आहे. याअगोदर मोहनलाल एक प्रोफेशनल रेसलरसुद्धा राहिले आहेत. मोहनलाल यांना २००१ मध्ये भारत सरकार द्वारे पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. मोहनलाल असे अभिनेते आहेत ज्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या गटात नऊ वेळा राष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. तर कितेक वेळा ते सन्मानित देखील झाले आहेत. बॉलीवूडचा शहंशाह अमिताभ बच्चनसुद्धा मोहनलालचे खूप मोठे फॅन आहेत. 2009 मध्ये भारतीय सैन्याने त्यांना लेफ्टनंट कर्नलचा किताब दिला आहे.