बॉलीवूड इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोराची फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे. चाहते तिच्या अभिनयासाठी वेडे असतात. मलायकाने अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये एकापेक्षा एक कलाकारांसोबत काम केले आहे. मलायका सोशल मिडियावर खूप सक्रीय असते. ती नेहमी आपले फोटोज आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेयर करत असते. चाहते तिच्या पोस्टवर भरभरून कमेंट आणि लाईक करतात.

अभिनेत्री मलायका अरोराने १९९८ मध्ये बॉलीवूड अभिनेता अरबाज खानसोबत लग्न केले होते. दोघांच्या लग्नाची खूपच चर्चा झाली होती. चाहत्यांना दोघांची जोडी देखील खूप आवडत होती. दोघांना एक मुलगा देखील हे. ज्याचे नाव अरहान आहे. तथापि त्यांचे लग्न शेवटपर्यंत टिकले नाही आणि दोघांनी १९ वर्षानंत घटस्फोट घेतला. २०१७ मध्ये त्यांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर मुलगा अरहानची कस्टडी त्याची आई मलायका अरोराकडे आली होती.

मलायकाने आपल्या खुलास्यामध्ये म्हंटले होते कि जेव्हा ती अरबाजसोबत घटस्फोट घेत होती तेव्हा तिच्या मनामध्ये हे होते कि अरहानची कस्टडी स्वतःकडे ठेवेल. पण तिला भीती होती कि ती एकटीच तिची काळजी कशी घेईल. ती खूपच खचली होती तिने स्वतःला सावरले आणि मुलाला सांभाळले.

अभिनेत्रीचे म्हणणे आहे कि ती आपल्या मुलासमोर एक चांगले उदाहरण ठेऊ इच्छित होती. तिला नेहमीच आपल्या मुलाला वेळ द्यायचा होता, कारण तो मोठा होत होता आणि त्याला तिची गरज होती. अभिनेत्रीची इच्छा होती कि अरहानने चुका कराव्यात आणि त्यामधून शिकवण घ्यावी. यावेळी अरहान विदेशामध्ये आपले शिक्षण पूर्ण करत आहे.
मलायका अरोराच्या लव लाईफ बद्दल बोलायचे झाले तर गेल्या काही वर्षांपासून ती बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. दोघांची जोडी सध्या सर्वात जास्त पसंद केल्या जाणाऱ्या जोडींपैकी एक बनली आहे. दोघांना नेहमी एकत्र स्पॉट केले जाते. दोघे वीकेंड्सवर देखील एकत्र पाहायला मिळत असतात.