मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर एकमेकांना जवळ जवळ ५ वर्षापासून डेट करत आहेत. अभिनेत्री मलायका अर्जुन कपूरपेक्षा १२ वर्षाने मोठी आहे. असे असून देखील दोघांच्या प्रेमात कधीच कमतरता पडत नाही. अभिनेत्रीने म्हंटले कि आयुष्याच्या शेवटपर्यंत अर्जुनसोबत राहायचे आहे. त्याच्यासोबत तिला म्हातारे व्हायचे आहे. इतकेच नाही तर हा देखील खुलासा केला कि तिला अर्जुनची साथ खूपच पसंद आहे.

अर्जुनच्या अगोदर मलायका अरोरा अरबाज खानसोबत राहत होती. अरबाज खान आणि मलायका अरोराने १९९८ मध्ये लग्न केले होते. १९ वर्षे सोबत राहिल्यानंतर २०१७ मध्ये दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला.

घटस्फोटाचे कारण अरबाज खानचे बदलते नेचर आणि त्याच्या वाईट सवयी सांगितले जात होते. अभिनेत्रीने एका मुलाखतीदरम्यान म्हंटले होते कि जेव्हा नात्यामध्ये काही नसेल तेव्हा त्याला संपवणे चांगले असते. तर अरबाज खानने देखील आपल्या सफाईमध्ये सांगितले होते कि मलायकाने जे काही मागीते ते तिला सर्व काही दिले. कधीच तिला कोणत्याही गोष्टीमध्ये अडवले नाही.

अर्जुन कपूरबद्दल तिने म्हंटले होते कि तो माझ्याशिवाय प्रत्येक गोष्ट समजून घेतो. तो तिच्यासोबत खूपच संतुष्ट आहे. नात्यामध्ये १२ वर्षापेक्षा लहान असूनदेखील त्याच्या समजूतदारपण खूपच मजबूत आहे. असे नाते आणि असे आयुष्य मी देखील कधी जगले होते. तर अरबाजबद्दल अभिनेत्रीने म्हंटले कि काळानुसार आमचे विचार बदलत गेले. कदाचित आम्ही दोघे एकमेकांसोबत संतुष्ट होत नव्हतो. रोजच्या छोट्या छोट्या भांडणाचे रुपांतर घटस्फोटात झाले.

मलायका आणि अरबाज खानला एक मुलगा देखील आहे. ज्याचे नाव अरहान खान आहे. दोघांच्या घटस्फोटानंतर अरहान खानची कस्टडी मलायका अरोराला मिळाली होती. अरहान खान आता अर्जुन आणि मलायकासोबत राहत आहे. तर अभिनेता अरबाज खान अजून देखील त्याचा मुलगा अरहानला भेटत असतो.