‘ब्रे स्टफीडिंग’ सीनबद्दल पहिल्यांदाच बोलली मंदाकिनी, म्हणाली; त्या सीननंतर माझ्यासोबत…

3 Min Read

हिंदी चित्रपटामधील दिग्गज अभिनेता, निर्माता-दिग्दर्शक राहिलेले राज कपूरचा १९८५ मध्ये आलेला राम तेरी गंगा मैली चित्रपट तर सर्वांनाच माहिती आहे. हा चित्रपट ब्लॉकबस्टर राहिला होता. चित्रपटामध्ये दिसलेले अनेक कलाकार देखील रातोरात फेमस झाले होते. या चित्रपटामधून अभिनेत्री मंदाकिनी देखील खूपच फेमस झाली होती. चित्रपट तर सुपरहिट झाला होता आणि अभिनेत्रीचे बोल्ड सीन देखील चर्चेमध्ये राहिले होते.

मंदाकिनीने त्यावेळी या चित्रपटामध्ये सर्वात जास्त बोल्ड सीन दिले होते ज्यामुळे खूपच खळबळ उडाली होती. काही लोकांनी याला क्लासिक चित्रपट मानले तर काही लोक याला सॉफ्ट पॉ र्न देखील म्हणू लागले होती. चित्रपटामध्ये धबधब्याखाली अंघोळ करतानाचा एक सीन होता. या सीनमुळे मंदाकिनीला टिकेचा सामना देखील करावा लागला होता. चित्रपटामध्ये मंदाकिनीचा ब्रेस्टफीडिंग सीन देखील होता. चित्रपटामधून हा सीन खूपच चर्चेमध्ये राहिला होता. चित्रपटामधील या सिन्समुळे अभिनेत्री मंदाकिनीला बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखले जाऊ लागले होते. आता ३७ वर्षानंतर मंदाकिनीने ब्रेस्टफीडिंग सीन बद्दल मौन सोडले आहे. तिने सांगितले कि त्या सीनच्या मागे कोणते कारण होते.मंदाकिनीने एका सीनदरम्यान उघडपणे यावर चर्चा केली होती. अभिनेत्रीने सांगितले कि जेव्हा तिने हा सीन केला होता तेव्हा लोकांनी तिला बरेच काही बोलले होते. जेव्हा मुलाखतीदरम्यान मंदाकिनीला याबद्दल विचारले गेले तेव्हा ती म्हणाली कि सर्वात पहिला मी लोकांना क्लियर करते कि तो एक ब्रेस्टफीडिंग सीन नव्हता. तो सीन अशाप्रकारे शूट केला गेला होता कि लोकांना पाहताना तसा वाटावा. हि चित्रपटाची डिमांड होती.

मंदाकिनीने मुलाखतीदरम्यान पुढे सांगितले कि हा सीन शूट करण्यामागे मोठी स्टोरी आहे. तुम्ही स्क्रीनवर जो सीन पाहत आहात तो टेक्निकल देखील असतो. पण आज ज्याप्रमाणे चित्रपटामध्ये स्कीन शो केली जाते त्यापेक्षा हा सीन काहीच नाही. खरे सांगायचे झाले तर हा सीन खूपच चांगल्या भावनेने शूट केला गेला होता, पण आजच्या चित्रपटामध्ये फक्त कामुकता दाखवली जाते.जेव्हा मंदाकिनीला हा प्रश्न विचारला गेला कि पद्मिनी कोल्हापुरी एकदा म्हणाली होती कि या चित्रपटासाठी तिने ४५ दिवसांची शुटींग केली होती पण मंदाकिनीमुळे तिला चित्रपटामधून काढून टाकले. मंदाकिनीने यावर सांगितले कि राज कपूर यांना राम तेरी गंगा मैली चित्रपटासाठी एक फ्रेश चेहरा पाहिजे होता. मला पद्मिनी कोल्हापुरी बद्दल काही माहिती नाही. मी फक्त इतकेच सांगू इच्छिते कि कोणालातरी ती भूमिका करायची होती, पण राज कपूर यांची इच्छा होती कि ती भूमिका मी करावी.राम तेरी गंगा मैली चित्रपटाच्या माध्यमातून राज कपूरचा मुलगा राजीवला लॉन्च करायचे होते. यामुळे त्यांच्या ऑपोजिट ते नवीन चेहऱ्याच्या शोधात होते आणि मंदाकिनी सौभाग्यशाली सिद्ध झाली. १९९६ मध्ये जोरदार चित्रपटामध्ये मंदाकिनी शेवटची पाहायला मिळाली होती. पण ती काही खास प्रदर्शन करू शकली नाही. यानंतर मंदाकिनी चित्रपटांपासुन दूर गेली. नुकतेच तिचा एक व्हिडीओ रिलीज झाला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून मंदाकिनीने २६ वर्षानंतर पुनरागमन केले आहे. मंदाकिनीने तिचा मुलगा राबील ठाकूर सोबत मां ओ मां व्हिडीओमध्ये काम केले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *