प्रसिद्ध फिल्ममेकर राज कपूरचा शेवटचा निर्देशित चित्रपट मुलगा राजीव कपूरसोबत राम तेरी गंगा मैली होता. तथापि या चित्रपटामधून राजीव कपूर नाही तर आपल्या करियरमधील दुसरा चित्रपट करत असलेली अभिनेत्री मंदाकिनीला खूपच प्रसिद्धी मिळाली होती. याचे मोठे कारण बनले होते चित्रपटामधील दोन विवादित सीन.

जिथे चित्रपटाच्या एका सीनमध्ये मंदाकिनीला ब्रे स्ट फी डिंग करताना दाखवले गेले होते. तर एका दुसऱ्या सीनमध्ये ती पांढऱ्या पारदर्शक साडीत धबधब्याखाली उभी असलेली दिसली होती. या दोन्ही सिन्सने मंदाकिनीला एका रात्रीमध्ये स्टार बनवले होते. तिच्या या सीनवर खूप वाद देखील झाला होता. आता ३७ वर्षानंतर मंदाकिनीने या सीनवर मौन सोडले आहे.

एका मुलाखतीमध्ये चित्रपटाच्या ब्रेस्टफीडिंग सीनवर बोलताना मंदाकिनी म्हणाली कि सर्वात पहिला तर हे सांगू इच्छिते कि हा एक ब्रेस्टफीडिंग सीन नव्हता. याला काही अशाप्रकारे शूट केले गेले होते कि हा सीन रियल वाटावा. हे सर्व खूपच तांत्रिक पद्धतीने केले जाते. त्यावेळी भले हि लोकांनी या सीनबद्दल खूप काही बोलले पण त्यापेक्षा जास्तच आजच्या काळामध्ये दाखवले जाते.

या सीनबद्दल पुढे बोलताना मंदाकिनी म्हणाली कि लोकांना सर्वात पहिला हे समजले पाहिजे कि चित्रपटामध्ये या सीनला ग्लॅमरसाठी टाकण्यात आले नव्हते. हि स्टोरीची डिमांड होती आणि या सीनला खूपच पवित्रतेने शूट केले गेले होते. आजच्या चित्रपटांमध्ये जे होत आहे त्यामध्ये फक्त से क्शु ए लिटी पाहायला मिळते.

याशिवाय चित्रपटाच्या आणखी एका सीनमुळे वाद झाला होता. या सीनमध्ये मंदाकिनी चित्रपटाच्या एका गाण्यामध्ये धबधब्याखाली पांढऱ्या रंगाची साडी घालून भिजताना दिसत आहे. या मुलाखतीमध्ये जेव्हा मंदाकिनीला विचारले गेले कि हा सीन दिल्याबद्दल तुला काही पश्चाताप झाला का. ती म्हणाली त्यात कसला पश्चाताप, हे माझे नशीब आहे. त्यावेळी एका सीनमुळे चाहते माझी आठवण काढतात. हि वेगळी गोष्ट आहे कि काही लोक चांगले बोलतात तर काही लोक चेष्टा करतात. पण मला फरक पडत नाही.

गेल्या काही दिवसांमध्ये पद्मिनी कोल्हापुरेने एका मुलाखतीमध्ये दावा केला होता कि ४५ दिवसांपर्यंत मंदाकिनीसोबत शुटींग केल्यानंतर राज कपूर राम तेरी गंगा मैली मध्ये मंदाकिनीच्या ठिकाणी तिला कास्ट करणार होते. त्यांनी यासाठी पद्मिनीशी संपर्क देखील केला होता. पण ब्रे स्ट फी डिंग सीनमुळे नाही तर ऑनस्क्रीन किसिंग सीनमुळे या चित्रपटाला रिजेक्ट केले होते. याबद्दल बोलताना मंदाकिनी म्हणाली कि मला याबद्दल काहीच माहिती नाही, फक्त इतकेच माहिती आहे कि प्रत्येकाला हि भूमिका करायची होती पण राज कपूरला एक नवीन चेहरा पाहिजे होता त्यामुळे त्यांनी मला कास्ट केले होते. राज कपूरने फक्त २० वर्षीय मंदाकिनीला शोधून या चित्रपटामध्ये कास्ट केले होते.