प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री मंदिरा बेदी १५ एप्रिलला आपला वाढदिवस साजरा करते. मंदिरा बेदी छोट्या आणि मोठ्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती दूरदर्शन वरील शांती या मालिकेमध्ये पाहायला मिळाली होती जी १९९४ मध्ये सुरु झाली होती. यानंतर तिने अनेक टीव्ही सिरियल्समध्ये काम करून लोकांची मने जिंकली. मंदिरा बेदीने गेल्या वर्षी आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एक मोठा खुलासा केला होता.

एका मुलाखती दरम्यान बोलताना मंदिरा बेदी म्हणाली होती कि फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत असल्यामुळे ती जवळ जवळ १२ वर्षे आई बनण्यापासून दूर राहिली. मंदिराने सांगितले कि वयाच्या २० व्या वर्षी मी मनोरंजन जगतामध्ये माझी ओळख निर्माण करत होते. ३० व्या वर्षी मला स्वतःला असुरक्षित वाटत होते आणि आता ४० व्या वर्षी मला चांगले वाटत आहे.मुलाखती दरम्यान मंदिरा बेदी पुढे म्हणाली कि मी २०११ मध्ये मुलाला जन्म दिला. त्यावेळी मी ३९ वर्षांची होते. मी अनेक करार केले असल्यामुळे मला प्रेग्नंट राहता आले नाही. मला भीती वाटत होती कि जर मी प्रेग्नंट राहिले तर माझे करियर संपुष्टात येईल. मनोरंजनाचे जग खूपच वाईट आहे. माझ्या पतीच्या संमतीशिवाय मला असे करता येऊ शकत नव्हते. त्यांच्यामुळेच आमचे लग्न यशस्वी होऊ शकले.
मंदिरा बेदीने १९९९ मध्ये दिग्दर्शक राज कौशलसोबत लग्न केले होते. मंदिरा बेदीने सांगितले कि मला असे वाटत होते कि माझे काम कधीही थांबू शकत होते. मला असुरक्षित वाटू लागले होते. मंदिरा बेदीने शाहरुख खानच्या दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या चित्रपटामधून आपल्या करियरची सुरवात केली होती. यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. नुकतेच ती साउथचा प्रसिद्ध अभिनेता प्रभासच्या साहो चित्रपटामध्ये पाहायला मिळाली होती. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने बक्कळ गल्ला जमवला होता.