बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे आपल्या अभिनयाच्या जोरावर सफल झाले आहेत. आजकाल दर्शकांना मोठ मोठ्या स्टार्सचे चित्रपट नाही तर एक दमदार स्टोरी असलेले आणि दमदार अभिनय असलेले चित्रपट पाहायला आवडतात. मनोज वाजपेयी सुद्धा एक दिग्गज अभिनेता आहे. मनोज वाजपेयीचा जन्म २३ एप्रिल १९६९ रोजी बेलवा चंपारण मध्ये झाला होता.

मनोज वाजपेयीला जेव्हा ४ वेळा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून वगळण्यात आले होते तेव्हा ते आत्महत्या करून आपले आयुष्य संपवणार होते. पण तेव्हा त्यांना रघुवीर यादवने बॅरी जॉनचीच्या अॅ्क्टिंग वर्कशॉपमध्ये जाण्याचा सल्ला दिला. मनोज वाजपेयीच्या पत्नीचे नाव नेहा आहे. नेहाचासुद्धा बॉलीवूडशी चांगलाच संबंध आहे. तिचे खरे नाव शबाना रजा आहे. नेहाने आपल्या करियरची सुरवात बॉबी देओलच्या करीब चित्रपटामधून केली होती. १७ जुलै १९९८ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने त्यावेळी बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला होता.मनोज वाजपेयीचा ज्यावेळी संघर्षाचा काळ सुरु होता त्यावेळी त्यांनी दिल्लीतील एका मुलीशी लग्न केले. परंतु त्यांचे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही. अवघ्या दोन महिन्यातच दोघेही घटस्फोट घेऊन वेगळे झाले. एका मुलाखतीमध्ये याचे मुख्य कारण मनोज वाजपेयीने त्याच्या संघर्षाचा काळ सांगितले होते. तथापि नंतर मनोज वाजपेयीच्या आयुष्यामध्ये नेहा आली. मनोज वाजपेयी आणि नेहा यांना एक मुलगी आहे.मनोज वाजपेयीने आपल्या करियरची सुरवात दूरदर्शन वरून केली होती. दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या स्वाभिमान या सिरीयलमध्ये त्याने सर्वप्रथम काम केले होते. यानंतर त्यांना बॅंडिट क्वीन चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली. परंतु त्याला खरी ओळख सत्या चित्रपटामधून मिळाली जो १९९८ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये त्याने भिकू म्हात्रेची भूमिका साकारली होती.