मान्यता दत्त कधी बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये एक सफल अभिनेत्री बनण्याचे स्वप्न घेऊन आली होती. तथापि तिला कोणत्याही बॉलीवूड चित्रपटामध्ये मनासारखे काम मिळाले नाही. बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम करून नेहमी बॉलीवूड चित्रपटांसाठी ती संधी शोधत असायची. मान्यताला तो ब्रेक देखील मिळाला पण इथे तिला अभिनयाची संधी मिळाली नाही तर आइटम नंबर करण्याचे काम मिळाले. प्रकाश झाच्या गंगाजल चित्रपटामध्ये अल्हड़ जवानी गाण्यामधील तिच्या डांसने प्रत्येकाला वेडे केले. बी ग्रेड चित्रपटांमधून मान्यताचे करियर सफल राहिले नाही पण तिला संजय दत्तच्या जवळ जरूर घेऊन आले. मान्यता दत्तचा नुकताच वाढदिवस होऊन गेला आहे ती ४२ वर्षांची झाली आहे आणि या निमित्ताने आपण आज तिच्या लव्ह लाईफ बद्दल जाणून घेणार आहोत.संजय दत्तसोबत कशी झाली होती भेट :- मान्यताला नेहमीच एक सफल अभिनेत्री बनायचे होते. बॉलीवूड मध्ये संधी मिळत नव्हती म्हणून तिने बी ग्रेड चित्रपट करायला सुरु केले. मान्यताला लवर्स लाइक अस चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटाचे राइट्स संजय दत्तने २० लाख रुपयात खरेदी केले होते. या चित्रपटानंतरच संजय दत्त आणि मान्यताच्या भेटीचे सत्र सुरु झाला.
प्रेमासमोर मान्यताने पाहिले नाही वयाचे अंतर :- संजय दत्त आणि मान्याता दत्त यांच्या वयाचे अंतर खूप आहे. मान्यता संजयपेक्षा २१ वर्षांनी लहान आहे. मान्यतापेक्षा संजय दत्तची मोठी मुलगी त्रिशाला १० वर्षांनी छोटी आहे पण मान्यताने पहिल्या भेटीमध्ये संजय दत्तला आपले हृदय दिले होते. लग्नाच्या अगोदर मान्यता आणि संजयने अनेक भेटी केल्या. दोघांचे नाते अधिक वाढत गेले आणि ७ फेब्रुवारी २००८ रोजी दोघांनी मिडिया आणि चाहत्यांपासून दूर जाऊन लग्न केले. लग्नाच्या वेळी मान्यता २९ वर्षांची होती आणि संजय ५० वर्षांचा होता. असे देखील ऐकण्यात आले होते कि संजय दत्तचे कुटुंब त्याच्या या लग्नाच्या विरुद्ध होते कारण मान्यता त्याच्यापेक्षा वयाने खूपच लहान होती.
दोन मुलांसोबत संजय आणि मान्यताचे आहे आनंदी आयुष्य :- २०१० मध्ये मान्यता दत्तने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला होता. शरान आणि इकरा संजय दत्त-मान्यताची मुले आहेत. सोशल मिडियावर दोघेही आपल्या कुटुंबाचे सुंदर फोटो शेयर करत असतात. संजय दत्त आणि मान्यताची जोडी एकत्र खूपच सुंदर दिसते आणि त्यांचे आनंदी कुटुंब पाहून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद नक्कीच दिसतो.
मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.