हे मराठी कलाकार नावापुढे आडनाव लावत नाहीत, जाणून घ्या खरी नावे ! आज या पॅकेजमधून आम्ही आपल्यालाठी अशा कलाकारांचे पॅकेज घेऊन आलो आहोत जे त्यांचे नाव पूर्ण न लावता शॉर्टकट वापरतात. नावात काय आहे? असं शेक्सपिअर म्हणला होता. समाजामध्ये तुम्हला तुमच्या नावामुळे नाही तर तुमच्या कामामुळे ओळख निर्माण होते. असं असून देखील अनेक जण आपलं खरं नाव बदलतात व नवीन नावाचा वापर करतात. हा ट्रेंड चित्रपट सृष्टीमध्ये खूप चालतो. नाव बदलण्याची अनेक कारणे असतात, कुणाचं नाव लक्षात ठेवायला अवघड आहे तर कुणाच्या नावाचा उच्चार देखील आपल्याला जमणार नाही. बऱ्याच कलाकार आणि अभिनेत्री ज्यांना आपण बऱ्याच वर्षांपासून ओळखत आहात त्यांना वेगळे मूळ नाव आहे, जे आपणास पूर्णपणे अनभिज्ञ आहेत. आज आपण अश्याच काही कलाकारांची खरी नावे जाणून घेऊयात.

रजनीकांत
मराठमोळे अभिनेता आणि दक्षिणेकडील सुपरस्टार रजनीकांत यांचे पूर्ण नाव शिवाजीराव गायकवाड असे आहे. असे म्हणतात की आडनाव न वापरणारे रजनीकांत हे सिनेसृष्टीतील पहिले अभिनेता आहेत.

जयश्री टी
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री जयश्री या त्यांच्या नावापुढे केवळ त्यांच्या आडनावाचा टी लावतात. प्रत्यक्षात त्यांचे पूर्ण नाव जयश्री तळपदे असे आहे. त्यांनी 1989 साली चित्रपट दिग्दर्शक जयप्रकाश कर्नाटकी यांच्यासोबत लग्न केले आहे.

रंजना
गतकाळातील दिवंगत अभिनेत्री रंजना यांचे पूर्ण नाव रंजना देशमुख असे होते.

अजय-अतुल़
आपल्या सुरेल स्वरांनी अख्ख्या मराठी जनतेला वेड लावणारे अजय-अतुल हे सख्खे भाऊ आहेत. त्यांचे पूर्ण नाव अजय गोगावले आणि अतुल गोगावले असे आहे.

अमृता सुभाष
मराठीतील लाडकी अभिनेत्री अमृता सुभाषचे पूर्ण नाव अमृता सुभाष कुलकर्णी आहे.

भाग्यश्री
‘मैने प्यार किया’ या ब्लॉकबस्टर चित्रपटातून नावाला आलेली अभिनेत्री भाग्यश्रीची क्रेझ अजूनही प्रेक्षकांमध्ये कायम आहे. भाग्यश्री सांगली येथील राजघराण्याची कन्या आहे. तिचे पूर्ण नाव आहे भाग्यश्री पटवर्धन. तर लग्नानंतर तिचे नाव भाग्यश्री दसानी असे आहे.

ललित प्रभाकर
‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता ललित प्रभाकर तरुणींचा लाडका अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहे. पण त्याच्या फार कमी फॅन्सला माहीत असेल की, ललितचे पूर्ण नाव ललित प्रभाकर भदाणे असे आहे.

रसिका सुनील
माझ्या नवऱ्याची बायको फेम रसिका सुनीलचे पूर्ण नाव फार कमी लोकांना माहीत आहे. रसिकाच्या वडिलांचे नाव सुनील आहे पण प्रत्यक्षात रसिकाचे पूर्ण नाव आहे रसिका सुनील धाबडगावकर.

सायली संजीव
सायली संजीव हे तिचे पूर्ण नाव नाही. सायली तिच्या नावात केवळ वडिलांचे नाव लावते सायलीचे पूर्ण नाव आहे, सायली संजीव चांदसारकर.