प्रत्येक मुलगी हि तिच्या आईच्या खूप जवळची असते. मग भलेही मुली त्यांच्या वडिलांना प्रिय असतील. परंतु त्यांच्यामध्ये त्यांच्या आईचे सर्व गुण उतरलेले असतात. काही मुली दिसायला हुबेहूब आपल्या आईसारख्याच असतात. बॉलीवूडमध्येसुद्धा अशाच काही अभिनेत्री आहेत ज्या हुबेहूब त्यांच्या आईसारख्या दिसतात.जान्हवी कपूर :- बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये जान्हवी कपूरला श्रीदेवीची सावली म्हणून ओळखले जाते. जान्हवी कपूरचा चेहरा हुबेहूब तिची आई श्रीदेवीसारखा दिसतो. हेच मुख्य कारण आहे ज्यामुळे खूप कमी काळामध्ये जान्हवी कपूर बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये एक नामांकित चेहरा बनली आहे.श्रुति हासन :- श्रुति हासन हि साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील सुप्रसिद्ध अभिनेता कमल हासनची मुलगी आहे. तिच्या आईचे नाव सारिका हासन असे आहे. सारिका हि तिच्या काळामधील खूप यशस्वी अभिनेत्री होती. श्रुतिमध्ये सारीकाची झलक आपल्याला पाहायला मिळते.
सारा अली खान :- बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान सैफ अली खानची पहिली पत्नी अमृता सिंगची मुलगी आहे. अमृता हि एके काळची खूप प्रसिद्ध अभिनेत्री होती. सारा अली खानचा चेहरा हुबेहूब तिची आई अमृता सिंगसारखा दिसतो.आलिया भट्ट :- आलिया भट्ट हि सुप्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट आणि सोनी राजदान यांची मुलगी आहे. सोनी राजदान हि एक ब्रिटीश अभिनेत्री असून ती एक दिग्दर्शकसुद्धा आहे. आलीय भट्ट बर्‍याच अंशी तिची आई सोनी राजदानसारखीच दिसते.श्रद्धा कपूर :- बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर हि शिवांगी कोल्हापुरी आणि शक्ती कपूर यांची मुलगी आहे. श्रद्धा कपूरचा चेहरा हुबेहूब तिची आई शिवांगीसारखाच दिसतो. त्या दोघी इतक्या हुबेहूब दिसतात कि त्यांच्यातील फरक सांगणे खूपच कठीण आहे.ईशा देओल :- बॉलीवूड अभिनेत्री ईशा देओल प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनीची मुलगी आहे. ईशा देओल हि दिसायला तिची आई हेमा मालिनीसारखीच आहे. तथापि, हि गोष्ट वेगळी आहे कि ईशा देओल हेमा मालिनीसारखे बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये फारसे नाव कमवू शकली नाही.ट्विंकल खन्ना :- बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना खन्ना हि अभिनेत्री डिंपल कपाड़ियाची मुलगी आहे. १९७३ मध्ये ट्विंकल खन्नाचा जन्म झाला होता. ट्विंकल आणि डिंपल कपाड़िया या दोघींच्या चेहऱ्यामध्ये खूपच साम्य पाहायला मिळते.