अनेक टीव्ही सिरियल्समध्ये आपल्या फेवरेट जोड्या आपण पाहत असतो. मग त्या भावा-बहिणीच्या, असोत किंवा बहिणींच्या असोत किंवा पती-पत्नीच्या असोत. या सर्वच जोड्यांना दर्शक भरभरून प्रेम देत असतात. टीव्ही सिरीयलमध्ये अशाच काही बहिणींच्या जोड्या देखील आहेत ज्या दर्शकांच्या खूपच फेवरेट आहेत. अशाच काही जोड्यांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
स्वरा आणि रागिनी :- स्वरागिनी सिरीयलमध्ये स्वरा आणि रागिनीची जोडी सर्वात आकर्षक जोडींपैकी एक होती. स्वरागिनी सिरीयल दर्शक खूपच पसंत करत होते, तथा या सिरीयलचे नाव देखील दोन्ही बहिणींच्या नावाच्या प्रेरणेने देण्यात आले होते. टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री हेली शाह आणि तेजस्वी प्रकाशने या सिरीयलमध्ये मुख्य भूमिका साकारल्या होत्या.सिमर आणि रोली :- सिमर आणि रोलीची सुंदर जोडी दर्शक आज देखील विसरू शकले नाहीत. हि सिरीयल दर्शक खूपच पसंत करत होते, पण याचे मुख्य कारण सिमर आणि रोली यांची उत्कृष्ठ केमिस्ट्री सुद्धा होती. ससुराल सिमर का सिरीयलमध्ये दीपिका कक्कड द्वारे सिमरची भूमिका साकारण्यात आली होती. तर रोली भारद्वाजची भूमिका अविका गौरने साकारली होती.
थपकी आणि अदिति :- थपकी आणि अदितिच्या जोडीला दर्शक आजदेखील विसरू शकलेले नाही. त्यांच्या उत्कृष्ठ जोडीने दर्शकांची मने जिंकली होती. दोन्ही बहिणी एकमेकांच्या सुख-दुखामध्ये एकमेकींसोबत उभ्या राहत असत. जिज्ञासा सिंह आणि शीना बजाजने या सिरीयलमध्ये सख्या बहिणींची भूमिका साकारली होती.
जीविका आणि मानवी :- टीव्हीवरील लोकप्रिय सिरीयल एक हजारों में मेरी बहना है मध्ये क्रिस्टल डिसूजा ने जीविका चौधरी आणि निया शर्मा ने मानवी चौधरीची भूमिका साकारली होती, जी जीविकाची लहान बहिण होती. या सिरीयलचे प्रसारण ३ ऑक्टोबर २०११ पासून १३ सप्टेंबर २०१३ पर्यंत करण्यात आले होते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.