बॉलीवूडमध्ये बऱ्याचदा कोणाच्याना कोणाच्या अफेयर, लव्ह किंवा ब्रेकअपच्या बातम्या समोर येत असतात. तसे बॉलीवूड स्टार्स नेहमी आपले लव्ह इंट्रेस्ट बदलत राहतात. आज आम्ही तुम्हाला बॉलीवूडमधील काही अशा अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत ज्या आपल्या अफेयर्समुळे खूपच चर्चेमध्ये राहिल्या आहेत.

या अभिनेत्रींच्या अफेयर्सबद्दल खूपच कमी लोकांना माहिती आहे. यामधील काही अभिनेत्री अशादेखील आहेत ज्यांनी आपल्या बॉयफ्रेंडसोबत लग्न करून आयुष्याला एक खास मोड दिला आहे. आज आम्ही बॉलीवूडच्या अशाच अभिनेत्रींची ओळख करून देणार आहोत.

प्रियांका चोप्रा :- बॉलीवूडमध्ये देसी गर्ल म्हणून ओळख बनवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा आता विदेशामध्ये स्थायिक झाली आहे. तिने हॉलीवुडमधील टीव्ही सिरीज आणि चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. तिच्या कामाचे विदेशामध्ये देखील खूप कौतुक केले जाते. तिने हॉलीवुड अॅलक्टर आणि सिंगर निक जोनाससोबत लग्न केले आहे. लग्नाच्या अगोदर तिचे ६ बॉयफ्रेंड राहिले आहेत, ज्यामध्ये अक्षय कुमार, हरमन बवेजा, शाहिद कपूर, असीम मर्चेंट, टॉम हिडलस्टन आणि शाहरुख़ खान सुद्धा सामील आहेत. प्रियांकाने निकला बराच काळ डेट केले होते नंतर तिने २०१८ मध्ये लग्न केले.दीपिका पादुकोण :- दीपिका पादुकोण बॉलीवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने बॉलीवूडमधील अनेक चित्रपटांमधून प्रसिद्धी मिळवली आहेत, हॉलीवुड चित्रपट ट्रिपल एक्स च्या तिसऱ्या सिरीजमध्ये सुद्धा ती दिसली होती. सध्या ती रणवीर सिंह सोबत लग्न करून सुखी वैवाहिक जीवन व्यतीत करत आहे. लग्नापूर्वी तिचे ७ अफेयर्स राहिले होते ज्यामध्ये सिद्धार्थ माल्या, मुज़म्मिल इब्राहिम, महेंद्र सिंह धोनी, युवराज सिंह, निहार पंड्या, उपेन पटेल आणि रणबीर कपूर सामील आहेत.आलिया भट्ट :- आलिया भट्टने खूपच कमी काळामध्ये बॉलीवूड आणि लोकांच्या मनामध्ये आपले एक खास स्थान निर्माण केले आहे. सध्या ती ब्रह्मास्त्र या आगामी चित्रपटामुळे खूप चर्चेमध्ये आहे. याशिवाय तिच्या आणि रणबीर कपूरच्या अफेयरच्या बातम्या देखील नेहमी समोर येत असतात. रणबीर कपूरशिवाय आलियाने सिद्धार्थ मल्होत्रा, केविन मित्तल आणि अली दादरकरला सुद्धा डेट केले आहे. तसे तर हा सुद्धा कयास लावला जात आहे कि तिचे वरुण धवनसोबत सुद्धा अफेयर होते.रेखा :- बॉलीवूडमध्ये रेखा एक सदाबहार अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आजसुद्धा तिचे अनेक चाहते आहेत. तसे तर रेखा आपल्या रील लाईफपेक्षा रियल लाईफमुळे खूप चर्चेमध्ये राहिली. तिचे सर्वात जास्त अफेयर राहिले आहेत. तिचे नाव साजिद खान, नवीन निष्कल, बिश्वजीत चटर्जी, जीतेन्द्र, शत्रुघ्न सिन्हा, विनोद मेहरा, किरण कुमार, अमिताभ बच्चन, मुकेश अग्रवाल आणि अक्षय कुमार सोबत सुद्धा जोडले गेले आहे. तिने मुकेश अग्रवालसोबत १९९० मध्ये लग्न केले होते, पण तिचे लग्न फार काळ टिकू शकले नाही. तसे तर रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या चर्चा आजदेखील होतात.मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.